पुणे शहरमहाराष्ट्र

टीईटी परीक्षा घोटाळा; उत्तर प्रदेशात एकाला पुणे पोलिसांकडून अटक

पुणे : टीईटी परीक्षा घोटाळ्याप्रकरणी आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. सौरभ त्रिपाठी असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. उत्तर प्रदेशातील लखनऊमधून त्याला अटक करण्यात आली आहे. सौरभ त्रिपाठी असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे.

पुणे सायबर पोलीस सौरभ त्रिपाठीला पुण्यात आणणार आहेत. पुण्यात आणून पुणे पोलीस सौरभ त्रिपाठीची चौकशी करण्यात येणार आहे. सौरभ त्रिपाठी हा जीए टेक्नॉलॉजी कंपनीशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे. सौरभ त्रिपाठी हा विनर कंपनी चालवत असल्याची माहिती आहे. जीए टेक्नॉलॉजी कंपनीचा तत्कालीन संचालक आश्विन कुमार याला बंगळूरमधून अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पुणे सायबर पोलिसांनी या प्रकरणी थेट राज्याबाहेर कारवाई केली. या प्रकरणाचे धागेदोरे हे उच्च पदस्थ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचताना दिसत आहेत. 2017 मध्ये आश्विन कुमार हा जी ए टेक्नॉलॉजीचा संचालक होता. प्रीतिश देशमुखचा हा वरिष्ठ होता.

Img 20211129 wa0128

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये