सिनेजगत

अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका, उपचार सुरू

मुंबई : अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आला आहे. त्याची अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. त्याच्यावर अंधेरी पश्चिम येथील बेलेव्ह्यू रुग्णालयात उपचार सुरु आहेत. श्रेयस तळपदे त्याचा आगामी चित्रपट वेलकम टू द जंगलचे शूटिंग करत होता. शूटिंग संपल्यानंतर त्याला अचानक हृदयविकाराचा झटका आला. 

श्रेयस तळपदे दिवसभर शुटींगमध्ये व्यस्त होता. तिथे त्याची प्रकृती ठीक होती. शुटींगमध्ये त्याने अॅक्शन असलेले सीक्वेन्स शूट केले. शूट संपल्यानंतर तो घरी परतला. त्याने पत्नीला सांगितले की, त्याला अस्वस्थ वाटत आहे. तिने त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेले पण वाटेतच त्याला चक्कर आली.

Img 20231111 wa0004281292791598778819580777

या प्रकरणी रुग्णालयाने सांगितले की, “श्रेयस तळपदे रुग्णालयात दाखल आहे. त्याला संध्याकाळी उशिरा आणण्यात आले. त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. तसेच आता अभिनेत्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.

गोलमाल रिटर्न्स, ओम शांती ओम आणि इतर मधील त्याच्या भूमिकांसाठी लोकप्रिय असलेला श्रेयस तळपसे पुढे वेलकम टू द जंगलमध्ये दिसणार आहे. या कॉमेडी चित्रपटात संजय दत्त, सुनील शेट्टी, अर्शद वारसी, परेश रावल, जॉनी लीव्हर, राजपाल यादव, तुषार कपूर, कृष्णा अभिषेक, किकू शारदा यांच्याही भूमिका आहेत.

Img 20230717 wa0012281292712276676815194924
Img 20230511 wa0002282292722773256594657904

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये