पुणे शहर

नवीन समाविष्ट 23 गावांमधील लसीकरण मोहीम व विकासकामे या विषयी तातडीने बैठक घ्या : दिपाली धुमाळ

पुणे : पुणे महानगरपालिकेमध्ये नुकताच 23 गावांचा समावेश करण्यात आला आहे. या गावांमध्ये विकासकामे व लसीरकण करणे ही महापालिकेची नैतिक जबाबदारी आहे. पुणे महापालिकेच्या माध्यमातून महापालिकेच्या हददीमध्ये लसीकरण केंद्राच्या माध्यमातून लसीकरण करण्यात येत आहे. 23 गावातील लाेकसंख्या पाहता लसीकरणाचा वेग या गावांमध्ये कमी आहे. त्यामुळे या समाविष्ट गावातील विकासाबाबत व लसीकरण केंद्रांबाबत पालिका आयुक्तांनी तातडीने बैठक घ्यावी अशी मागणी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी केली आहे. Hold a meeting on vaccination campaign and development work in 23 newly included : Deepali Dhumal

याबाबतचे पत्र धुमाळ यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहे. काेराेनाचा प्रादुर्भाव कमी हाेणेसाठी लसीकरण हा एकमेव मार्ग सध्या दिसत आहे. काेराेनाची तिसरी लाट येण्याबाबत तज्ञांनी मत दर्शविले आहे. 23 गावांचा समावेश मनपा हददीत झाला असून त्याठिकाणी लसीकरण महापालिकेकडून करणे क्रमप्राप्त ठरत आहे.
तसेच 23 गावांमध्ये पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज व्यवस्था, शाळा, दवाखाने, आराेग्य, विदयुत व्यवस्था अशा अनेक समस्या असून या गावातील नागरिकांकडून मनपा हददीत समावेश झाल्याने ही सर्व कामे आता मार्गी लागतील अशी भावना असल्याचे धुमाळ यांनी म्हंटले आहे.

Img 20210701 wa0256

सदर 23 गावे महापालिकेच्या विविध क्षेत्रिय कार्यालयाच्या हददीत समाविष्ट केलेली आहेत. आता या गावातील विकासकामे व देखभाल दुरूस्तीची कामे करणेसाठी संबंधित खातेप्रमुखांची आपले स्तरावर तातडीने बैठक आयाेजित करण्यात यावी अशी मागणी धुमाळ यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये