पुण्यात कुठे होणार सर्वात मोठे वन्यजीव अनाथालय

पुणे : चांदणी चौकातील सर्वे नं ९६ येथील १३० एकर जागेवर देशातील सर्वात मोठे वन्यजीव अनाथालय व सफारी वर्ल्ड साकारणार आहे. आज या जागेची बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली.
राज्य सरकारने या प्रकल्पाला मंजूरी दिली असून या प्रकल्पासाठी ५६.४८ कोटी रुपयांचा निधी खर्च होणार आहे. या वन्यजीव अनाथालयात जखमी प्राण्यांवर उपचार देखील करण्यात येणार आहेत. खासदार सुप्रिया सुळे व नगरसेवक सचिन दोडके यांनी या प्रकल्पासाठी राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.
यावेळी वन अधिकारी राहुल पाटील, पुणे महिला शहराध्यक्ष स्वाती पोकळे, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, राष्ट्रवादी काँग्रेस खडकवासला अध्यक्ष काका चव्हाण, माजी नगरसेवक बाबा धुमाळ, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल वेडे पाटील आदि उपस्थित होते.



