कोथरुड

कोथरूडमध्ये भरारी पथकाची दमदार दंडात्मक कारवाई ; १ लाख ९५ हजार रुपयांचा दंड वसूल

कोथरूड : कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालय पुणे महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने “स्वच्छ भारत अभियान स्वच्छ सर्वेक्षण मिशन – २०२४” व “सफाई अपनाओ बीमारी भगाओ” अन्वये जनजागृती, गांधीगिरीतून सन्मान व दंडात्मक कारवाईची मोहिम कोथरूड मध्ये राबवण्यात आली. या कारवाईत मोठा दंड वसूल करण्यात आला.

सदर कारवाई डहाणूकर कॉलनी, कोथरूड गावठाण, भेलके नगर, मयूर कॉलनी, आयडियल कॉलनी, नवकेतन सोसायटी, कर्वे रस्ता, पौड रस्ता, मोरे विद्यालय, श्रमिक वसाहत, एम.आय. टी . कॉलेज, : जयभवानी नगर, शिक्षक नगर, सुतारदरा, म्हातोबा नगर , शिक्षक नगर, गुजरात कॉलनी, वृदांवन सोसायटी, शिवतिर्थ नगर, आशिष गार्डन, गाढवे कॉलनी, गणंजय  सोसायटी, भाजी मंडई, एकलव्य कॉलेज परिसर शास्त्रीनगर, गाढवे कॉलनी, डावी व उजवी भुसारी कॉलनी, बावधन गावठाण, नविन समाविष्ट बावधन व उत्तम नगर मध्ये करण्यात आली.

या कारवाईत भाजी विक्रेते, फळ विक्रेते, स्नॅकसेंटर, चहाविक्री, चिकन मटन शॉप, ज्यूसबार, बेकरी, हॉटेल पानपट्ट्या, फेरीवाले, सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणारे नागरिक, सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणारे,  थुंकी सम्राट, कचरा जाळणे, कचरा वर्गीकरण न करणे, राडारोडा तसेच नाल्यात कचरा टाकणे, प्लॅस्टिकचा वापर करणे इत्यादी कारणासाठी २४७ नागरिकांवर  दंडात्मक कारवाई करून तब्बल १,९५०७४/-  तब्बल (एक लाख पंचान्नो हजार चौऱ्या हत्तर रुपये फक्त) दंड वसूल करण्यात आला.

Fb img 16474137314571819310932637888379

ही कारवाई करत असताना जे व्यावसायिक पर्यावरण पूरक कापडी व कागदी पिशव्यांचा वापर करतात तसेच श्वान मालक लाडक्या श्वानास फिरायला घेऊन जाताना पुपस्कूप वापरतात त्यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. तसेच स्पिकरद्वारे जनजागृती करत असताना नागरिकांना व व्यावसायिकांना ओला व सुका कचरा वर्गीकरण करण्यासाठी दोन डब्बे ठेवा, प्लास्टिकचा वापर टाळा, कागदी व कापडी पिशव्यांचा वापर करा, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका, स्वच्छता पाळा नारू रोग टाळा, पाण्याचा जपून वापर करा, विजेची बचत करा, ओल्या कचऱ्या पासून खत निर्मिती करा, कचरा जाळू नका पर्यावरण दुषित करू नका अशाप्रकारे प्रबोधनात्मक सुचना देत जनजागृती करण्यात आली.

Img 20240404 wa00134916733315783821383

जनजागृती व दंडात्मक कारवाईची मोहिम प्रभाग क्रं. १०, ११, व १२ या तिन्ही प्रभागात सातत्याने राबविण्यात येत आहे. सदर दंडात्मक कारवाईची मोहिम घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त संदीप कदम, गणेश सोनुणे, महापालिका सहाय्यक आयुक्त प्रकाश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ आरोग्य निरिक्षक राम सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आली.  दमदार भरारी पथकातील शिलेदार आरोग्य निरिक्षक सचिन लोहकरे, करण कुंभार, हनुमंत चाकणकर, लक्ष्मीकांत कुलकर्णी, गणेश चोंधे, संतोष ताटकर, प्रमोद चव्हाण, गणेश साठे, रूपाली शेडगे, जया सांगडे, सुरज पवार मोकादम वैजीनाथ गायकवाड, आण्णा ढावरे, राम गायकवाड,अशोक कांबळे, साईनाथ तेलंगी, लक्ष्मण सोनवणे, बापू वाघमारे हे दोन भरारी पथकाच्या माध्यमातून मोहिम राबवत आहेत.

Img 20240404 wa00123413096165072096535

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये