राजकीयराष्ट्रीय

गोवा, उत्तराखंडमध्ये आज एकाच टप्प्यात मतदान

गोवा -गोव्यातील ४० आणि उत्तराखंडमधील ७० जागांसाठी आज एकाच टप्प्यात मतदान होणार आहे गोव्यात ११ लाख, तर उत्तराखंडमध्ये ८१ लाख मतदार आहेत या दोन्ही राज्यांत याआधी दुरंगी लढत होत होती़  मात्र, यंदा गोव्यात सत्ताधारी भाजप आणि मुख्य प्रतिस्पर्धी काँग्रेसबरोबरच आम आदमी पक्ष आणि तृणमूल काँग्रेस पक्ष रिंगणात उतरला आह़े  गोव्यात तृणमूल काँग्रेस आणि मगोप या पक्षांची युती आह़े  आम आदमी पक्ष स्वबळावर लढत आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, चर्चिल आलेमाव (तृणमूल काँग्रेस), रवी नाईक (भाजप), लक्ष्मीकांत पार्सेकर (अपक्ष), विजय सरदेसाई (गोवा फॉर्वर्ड पक्ष), सुदीन ढवळीकर (मगोप), माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल आदी निवडणुकीच्या रिंगणात आहेत़  राज्यात २०१७ च्या निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक १७, तर भाजपला १३ जागा मिळाल्या होत्या़ 

Screenshot 2022 01 29 09 52 08 45

उत्तराखंडची स्थापना २००० मध्ये झाल्यानंतरची ही पाचवी निवडणूक आहे. मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी, सत्पाल महाराज, सुबोध उनियाल, अरिवद पांडे, धनसिंह रावत आदी मंत्री रिंगणात आहेत़  काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री हरिश रावत, माजी मंत्री यशपाल आर्या आदी निवडणूक लढवत आहेत़  गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला ७० पैकी ५७ जागांचे प्रचंड बहुमत मिळाले होत़े  काँग्रेसला केवळ ११ जागा जिंकता आल्या होत्या.

उत्तर प्रदेशात दुसऱ्या टप्प्यात ५५ जागांसाठी मतदान होणार असून, ५८६ उमेदवार रिंगणात आहेत़  सहारणपूर, बिजनौर, मोरादाबाद, संभल, रामपूर, अमरोहा, बरेली आणि शाहजहानपूर आदी जिल्ह्यांमध्ये हे मतदान होईल़  गेल्या निवडणुकीत भाजपने ५५ पैकी ३८ जागा जिंकल्या होत्या.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये