पुणे शहर

पुणे महापालिकेची प्रभाग रचना आधी जाहीर होणार; आरक्षण नंतर निवडणूक आयोगाचा निर्णय

पुणे : राज्य निवडणूक आयोगाने ही पुणे महापालिकेच्या प्रभागांमध्ये आरक्षण टाकण्याचा टप्पा पुढे ढकलला आहे. यापूर्वी प्रारूप आराखडा जाहीर होतानाच आरक्षणाची सोडत काढली जात होती मात्र यंदा प्रथमच प्रभागरचना अंतिम झाल्यानंतर त्यावर आरक्षण टाकण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे त्याबाबतचा आदेश गुरुवारी आयोगाने काढला आहे.

पुणे महापालिकेने प्रारुप प्रभाग रचनेचा आराखडा आयोगाला सादर केला आहे.पण तो अद्याप जाहीर झालेला नाही निवडणूक आयोगाने गुरुवारी आरक्षणा संदर्भात आदेश काढला आहे.दरम्यान येत्या आठवड्याभरात प्रारूप आराखडा जाहीर करून त्यावर हरकती सूचना मागविल्या जाण्याची शक्यता आहे.

निवडणूक आयोगाने सुचवलेल्या बदलानुसार पुणे महापालिकेने 20 जानेवारी रोजी प्रारुप प्रभाग रचनेचा आराखडा सादर केला आहे. आता हा आराखडा आयोगाकडून कधी जाहीर होणार तो पुढची प्रक्रिया कधी होणार याची उत्सुकता लागली आहे.

Img 20220123 wa0404

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे 19 जानेवारी रोजी झालेल्या सुनावणीत राज्य सरकारने त्यांच्याकडे असलेली ओबीसींची माहिती मागासवर्ग आयोगाकडे द्यावी ती आकडेवारी तपासून त्यानुसार योग्य त्या शिफारशी राज्य सरकारला व निवडणूक आयोगाला करावेत असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत त्या पार्श्वभूमीवर निवडणूक गुरुवारी आदेश काढले आहेत.

Img 20211231 wa00066164473394770712000

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये