पुणे शहर

संवेदनशील चंद्रकांतदादा जेव्हा ‘डॉक्टर’ होतात…

पुणे : आपल्याकडे राजकारणात काही व्यक्ती मिळालेल्या पदामुळे मोठ्या होतात. पदामुळेच त्यांना जनमानसात प्रतिष्ठा मिळते. त्याउलट काहींच्या व्यक्तिमत्त्वामुळे पदाची उंची, प्रतिष्ठा वाढते. अशा व्यक्तींचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कितीही मोठ्या पदावर गेल्यावरही  त्यांचे पाय जमिनीवरच राहतात. त्यांना ना पदाचा गर्व असतो, ना वृथा अभिमान महाराष्ट्राच्या राजकारणातील असे व्यक्तिमत्व म्हणजे चंद्रकांतदादा पाटील

वास्तविक, भारतीय जनता पार्टीला कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून ओळखले जाते. रा. स्व. संघाच्या मुशीतून घडलेले सुसंस्कृत आणि संवेदनशील राजकारणी म्हणून चंद्रकांतदादा राज्यात सर्वदूर परिचित आहेत. पक्ष आणि कार्यकर्त्यांसाठी ते नेहमीच सज्ज असतात. कार्यकर्त्यांना कधी कशाचा त्रास होत असेल, तर वडिलधारेपणाच्या भूमिकेतून ते काळजी घेतात. त्यामुळे अनेक कार्यकर्ते दादांना पालकासमानच मानतात. 

Img 20240322 wa00017404573101520546217

दादांचा हाच वडिलधारेपणा आज शिवाजीनगरमध्ये कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा अनुभवायला मिळाला. लोकसभेच्या पुणे मतदारसंघातील निवडणुकीच्या अनुषंगाने शिवाजीनगर मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ०७ आणि १४ मधील पदाधिकाऱ्यांसोबत आज दादांची बैठक झाली.‌ 

पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांचा लोकसभा निवडणुकीत ४००+ खासदारांचा संकल्प आहे. मोदीजींचा हा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी कार्यकर्त्यांनी हृदयामध्ये महाविजयाची आस, जिभेवर साखर, डोक्यावर बर्फ आणि पायाला भिंगरी लावून घरोघरी संपर्क करावा, असे आवाहन दादांनी या वेळी केले. 

Img 20231109 wa001228129905032016030159557

या बैठकीत पक्षाच्या पदाधिकारी अमृता म्हेत्रे यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे दादांनी त्यांची आपुलकीने चौकशी केली. अन् बैठकीनंतर त्यांना आपल्याकडील आयुर्वेदिक औषधी गोळ्या देऊन औषध घेण्याची सूचनाही वडिलकीच्या नात्याने केली. दादांची संवेदनशीलता उपस्थित सर्वांनाच भावली.या बैठकीला राजेश पांडे, राजेश येनपुरे, दीपक पोटे, दत्ताभाऊ खाडे, गणेश बगाडे, रवी साळेगावकर, कुलदीप सावळेकर, शामराव सातपुते, सुतीज गोटेकर यांच्यासह मतदारसंघातील पक्षाचे सर्व पदाधिकारीही उपस्थित होते.

Img 20230511 wa0002282292969174931887579613

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये