रश्मी ठाकरेंच्या भावाची संपत्ती ED कडून जप्त

मुंबई : केंद्रीय अंमलबजावणी संचलनालय म्हणजेच ईडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे भाऊ श्रीधर पाटणकर यांची कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे.
ईडीने म्हटलं आहे की, उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे आणि रश्मी ठाकरे यांचे भाऊ श्रीधर पाटणकर यांची तब्बल 6.45 कोटीची संपत्ती जप्त केली आहे. याचा अर्थ या संपत्तीबाबत कोणत्याही प्रकारे व्यवहार श्रीधर पाटणकर करु शकणार नाहीत असं ईडीचं म्हणणं आहे. जी केस होती ईडी होती ती पुष्पक बुलियन नावाची कंपनी आहे त्या संदर्भातील ही केस होती. त्याच संदर्भात 11 फ्लॅट्स ठाण्यातील निलांबरी प्रोजेक्टमधील फ्लॅट्स जप्त केले आहेत.
हे फ्लॅट्स श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लिमिटेड नावाची कंपनी होती त्यांचे हे फ्लॅट होते. ईडीचं असं म्हणणं आहे. ही कंपनी श्रीधर पाटणकर हेच चालवतात. ही त्यांची कंपनी आहे म्हणजेच त्यांच्या मालकीची कंपनी आहे.




