राजकीयव्हायरल व्हिडिओ

‘टॅक्स फ्री’च्या मागणीवरील या उत्तराने केजरीवाल जोमात, भाजप कोमात

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेत बोलताना केजरीवाल यांनी भाजपच्या सिनेमा ‘टॅक्स फ्री’ करण्याबाबत होत असलेल्या मागणीची खिल्ली उडवली. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना सिनेमा तुम्ही यू-ट्यूबवर टाकायला सांगा, म्हणजे सगळंच फ्री-फ्री होईल आणि एकाच दिवसात सगळे लोकही हा सिनेमा बघतील,’ असं केजरीवाल यांनी सांगितले. चित्रपट प्रमोशनसाठी भाजपच्या कार्यकर्त्यांना पोस्टर बॉय करण्यात आलंय त्यामुळे त्यांनी आता आपमध्ये यावे, असे आवाहनही त्यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींना गेल्या आठ वर्षांत काहीच काम न केल्यामुळे तुम्हाला एका दिग्दर्शकाच्या पायाशी शरण जावं लागत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

कश्मीर फाईल्स हा चित्रपट एका धर्माला टार्गेट करण्यासाठी बनवला असून त्यावेळी मुस्लीम समाजावर झालेला अत्याचार यामध्ये दाखवला गेला नाही, असा आक्षेप काही लोकांकडून घेण्यात येत आहे. भाजपने या सिनेमाचं जोरदार समर्थन केलं असून हा सिनेमा टॅक्स फ्री करण्याची मागणी विविध गैरभाजपशासित राज्यांमध्ये केली आहे. बंटी आणि बबली या चित्रपटातील एका द्रष्यांचा संदर्भ देत ते म्हणाले, नेमकी काय मागणी करायची हे सुद्धा भाजप कार्यकर्त्यांना माहिती नसते, केवळ वरून आदेश आले की ते तसं करतात. आपने दिल्लीत केलेल्या कामांचा उल्लेख करत त्यांनी मोफत वीजेसारख्या योजनांचा लाभ भाजप कार्यकर्ते घेत आहेत, याकडे लक्ष वेधले. भाजप जगात सगळ्यात मोठा पक्ष असल्याचा दावा करतो. आप जगातील सगळ्यात छोटा राजकीय पक्ष आहे, तरी भाजपवाले आम्हाला घाबरतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या छायाचित्राबाबत भाजपला आक्षेप का असतो, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

Fb img 1647413731457

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये