अर्थजगत

LIC Share : ‘एलआयसी’चा शेअर वधारला

मुंबई : भांडवली बाजारात पदार्पण केल्यापासून सातत्याने घसरणाऱ्या भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) शेअरने तेजीची वाट धरली आहे. सलग चार सत्रात घसरणारा शेअर आज ३ टक्क्याने वधारला. यामुळे आयपीओमध्ये शेअर प्राप्त झालेल्या गुंतवणूकदारांचा जीव भांड्यात पडला आहे.

मुंबई शेअर बाजारात आज एलआयसीचा शेअर ८५२.१० रुपयांपर्यंत वाढला. त्यात ३ टक्के वाढ झाली होती. सध्या तो ८३२ रुपयांवर आहे. राष्ट्रीय शेअर बाजारात एलआयसीचा शेअर आज इन्ट्रा डे मध्ये ८५२.७० रुपयांवर गेला होता. सध्या तो ८३२.८५ रुपये इतका आहे. या तेजीने आज एलआयसीचे बाजार भांडवल ५,२६,८७२ कोटी इतके वाढले.

एलआयसीने गेल्याच आठवड्यात शेअर बाजारात प्रवेश केला होता. एलआयसीने २१ हजार कोटींचे भांडवल उभारले होते. केंद्र सरकारची १०० टक्के मालकी असलेल्या एलआयसीमधील ३.५ टक्के हिश्श्याची विक्री केली होती. भारतीय भांडवली बाजारातील आजवरचा हा सर्वात मोठा आयपीओ ठरला. मात्र एलआयसीची नोंदणी नकारात्मक झाली. तो आयपीओ प्राईसच्या तुलनेत ८ टक्के सवलतीच्या दरात सूचीबद्ध झाला होता.

नोंदणी झाल्यापासून सलग चार सत्रात एलआयसीच्या शेअरमध्ये घसरण झाली होती. त्यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांची चिंता वाढली होती. दरम्यान दिर्घ काळात एलआयसी चांगली कामगिरी करेल, असे अंदाज बड्या शेअर दलालांनी व्यक्त केले आहेत.

Img 20220521 wa0000

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये