राष्ट्रीय

सोनिया, राहुल गांधींना ईडीची नोटीस; ८ जून रोजी चौकशीसाठी बोलावले

नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना समन्स बजावले आहे. सोनिया गांधी यांना ८ जून रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. याबाबत बोलताना काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, आम्ही झुकून सामना करणार नाही. सिंघवी म्हणाले की, सोनिया गांधी स्वतः ईडीच्या कार्यालयात जाऊन सर्व प्रश्नांची उत्तरे देतील.

Img 20220531 wa00077152469800223841394

गांधी परिवाराविरोधात ईडीने समन्स बजावल्यानंतर राजकीय प्रतिक्रिया येत आहे. काँग्रेसच्या सर्व बड्या नेत्यांनी याबाबत भाष्य केले आहे. काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले, “ईडीने नॅशनल हेराल्ड प्रकरणातील कटाचा एक भाग म्हणून सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना नोटीस पाठवली आहे. पण आम्ही घाबरणार नाही, झुकणार नाही… छाती ठोकून  लढणार.”

Img 20220518 wa00135092505186750304354 2

त्याचवेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी आरोप केला आहे की, “यापूर्वी ईडीने हे प्रकरण बंद केले होते. भाजप राजकीय विरोधकांना धमकवण्यासाठी बाहुल्या असलेल्या सरकारी तपास यंत्रणांचा वापर करत आहेत.”

Img 20220521 wa0000

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये