राजकीय

संजय राऊत-वसंत मोरे यांची भेट

पुणे : मनसेचे नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची भेट झाली आहे. फपुण्यात एका लग्नसोहळ्याच्या निमित्ताने उभय नेत्यांमध्ये भेट झाली. यावेळी राऊतांनी वसंत मोरे यांच्या कामाचं तोंडभरुन कौतुक केलं. 

Img 20220518 wa00135092505186750304354 2

वसंत मोरे मनसेत नाराज असल्याचे बोलले जाते. पुण्याच्या शहराध्यक्षपदावरुन देखील त्यांना तत्काळ हटवलं गेलं आहे. मनसेच्या भोंग्याविरोधातल्या आंदोलनात देखील त्यांचा सक्रीय सहभाग नव्हता. राज ठाकरे यांच्या महत्त्वाकांक्षी भोंगेविरोधी आंदोलनाला त्यांनी कडाडून विरोध दर्शवला आहे. मात्र मी मनसेतच राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Img 20220531 wa00077152469800223841394

पुण्यातील एका लग्नसमारंभात संजय राऊत आणि वसंत मोरे यांची भेट झाली. या भेटीत राऊतांनी वसंत मोरे यांचं तोंडभरुन कौतुक केलं. ‘तुम्ही खूप भारी काम करताय’, अशी स्तुती राऊतांनी केली. यादरम्यान राऊतांनी वसंत मोरे यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. वसंत तात्यांनीही राऊतांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. काही वेळाच्या भेटीनंतर ‘पुन्हा भेटू’ म्हणत दोघांनीही एकमेकांचा निरोप घेतला.

मनसे शहराध्यक्ष पदावरून गेल्या महिन्यात वसंत मोरेंना हटवण्यात आलं. त्यानंतर वसंत मोरेंना इतर पक्षांकडून पक्षात येण्याच्या ऑफर आल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील वसंत मोरेंना फोन केला होता. वरुण देसाई यांनी वसंत तात्यांनी शिवसेनेत प्रवेश करावा, यासाठी प्रयत्न केले. पण सध्या माझा पक्ष सोडण्याचा कुठलाच विचार नाही, असं वसंत मोरेंनी स्पष्ट केले आहे.

Img 20220521 wa0000

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये