राष्ट्रीय

Sidhu Moosewala Murder case: मुसेवाला खून प्रकरण; पुण्यातून दोन शार्प शुटर्सला अटक

पुणे : पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येप्रकरणी पुण्यातील दोघांना अटक करण्यात आली आहे. पंजाबच्या मन्सा जिल्ह्यात २९ मे २०२२ रोजी सायंकाळी जवाहरके गावात झालेल्या हल्ल्यामध्ये मुसेवालांचा मृत्यू झाला होता

पंजाब पोलिसांच्या तपासामध्ये पुण्यातील सौरभ महाकाळ आणि संतोष जाधव या दोघांची नावं समोर आल्यानंतर त्यांना पंजाब पोलिसांनी पुण्यामधून ताब्यात घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली. मुसेवालांच्या हत्येसाठी एकूण आठ जणांना सुपारी देण्यात आली होती. यापैकी तिघे पंजाबमधील होते. तर अन्य पाच जणांना महाराष्ट्र आणि राजस्थानमधून बोलवण्यात आलं होतं. यामध्ये पुण्यातील दोघांचा समावेश आहे. या दोघांनाही पंजाब पोलिसांनी पुण्यातून आज सकाळच्या सुमारास अटक केली. संतोष जाधवचं नाव पुणे मंचरमधील गुन्हेगार ओंकार उर्फ़ राण्या बाणखेलेच्या हत्या प्रकरणात समोर आलं होतं. 

Img 20220518 wa00135092505186750304354 2

पोलिसांनी यापूर्वीच दिलेल्या माहितीनुसार या हत्येसाठी एएन-९४ ही रशियन बनावटीची असॉल्ट रायफल वापरण्यात आली. अशाप्रकारे पंजाबमधील गँगवॉरदरम्यान एएन-९४ रायफल वापरण्याची ही पहिलीच वेळ आहे. सिद्धू मुसेवाला यांच्यावर २ मिनिटांमध्ये ३० गोळ्या झाडण्यात आल्या. समोर आलेल्या माहितीनुसार मुसेवाला यांच्या गावात हल्लेखोर पोहचले तेव्हा मुसेवालांच्या सुरक्षेसाठी तैनात असणारे एके-४७ बंदुका घेऊन असलेले कमांडो पाहून परतले. त्यानंतर त्यांनी कॅनडामधील गँगस्टर सतींदर सिंग उर्फ गोल्डी ब्रारकडून एएन-९४ रायफल मागवली. याच रायफलने मुसेवालांची हत्या करण्यात आली.

मुसेवाला यांची रविवारी काही अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केली. सिद्धू मुसेवाला आपल्या काळ्या रंगाच्या थार गाडीमध्ये दोन मित्रांसहीत प्रवास करत असताना हा हल्ला झाला. गुरविंदर सिंग आणि गुरप्रीत सिंग यांच्यासोबत जात असतानाच सिद्धू मुसेवालाच गाडी चालवत होते. घरापासून काही अंतरावर असताना अचानक सिद्धू मुसेवाला यांच्या गाडीवर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. ज्या दिवशी हा हल्ला झाला त्या दिवशी सिद्धू मुसेवाला हे सुरक्षारक्षकांशिवाय आपल्या थार जीपने दोन मित्रांसोबत प्रवास करत होते.

सिद्धू मुसेवाला यांचे वडील बलकौर सिंग यांच्या सांगण्यानुसार मुसेवालांच्या गाडीच्या मागील गाडीमध्ये दोन सुरक्षारक्षकांसहीत ते स्वत: प्रवास करत होते. मात्र अचानक सिद्धू मुसेवालांच्या गाडीला एका एसयूव्ही आणि सेडान गाडीने ओव्हरटेक केला. या प्रत्येक गाडीमध्ये चार शसस्त्र हल्लेखोर होते. या दोन्ही गाड्यांमधून हल्लेखोर खाली उतरले आणि त्यांनी सिद्धू मुसेवाला यांच्यावर गोळीबार करुन तिथून पळ काढला.

पंजाब पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिद्धू मुसेवाला यांच्यावर ३० गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यांना रुग्णालयात दाखल करण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी घटनास्थळावरुन एन-९४ रायफलच्या गोळ्या सापडल्याची माहितीही दिली होती.

Img 20220521 wa0000

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये