राष्ट्रीय

राहुल गांधींची खासदारकी रद्द

नवी दिल्ली : गेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे? असा प्रश्न विचारत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. याप्रकरणी काल सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर आता राहुल गांधी यांचं संसद सदस्यत्व रद्द झाल्याची माहिती मिळाली असून, त्यांना खासदार म्हणून अपात्र ठरवण्यात आलं आहे.

राहुल गांधी यांच्या विधानामुळे संपूर्ण मोदी समुदायाचा अपमान झाल्याचा दावा भाजपचे आमदार पूर्णेश मोदी यांनी केला होता. त्यांनी या प्रकरणी कोर्टात केस दाखल केली होती.

चार वर्षापूर्वीच्या या प्रकरणावर शुक्रवारी सुनावणी पूर्ण झाली होती. त्यानंतर सुरत जिल्हा सत्र न्यायालयाने निकाल दिला. या प्रकरणात कोर्टाने राहुल गांधी यांना दोषी ठरवलं. दोन वर्षाची शिक्षा सुनावली. मात्र लगेच राहुल गांधी यांना जामीनही मंजूर करण्यात आला. मात्र त्यांची खासदारकी गेली. लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांच्यावर मोठी कारवाई केली.

Img 20230322 wa00041630956689324483588

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये