महाराष्ट्रराजकीय

शरद पवारांचा राजीनामा राष्ट्रवादीच्या ‘कोअर कमिटी’ने फेटाळला

मुंबई : शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीने फेटाळला आहे. याबाबत समितीने एकमताने ठराव मंजूर केला.

मुंबईत राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात या समितीची बैठक झाली. यात शरद पवारांचा राजीनामा एकमताने फेटाळण्यात आला आहे. प्रफुल्ल पटेल यांनी हा राजीनामा फेटाळण्याचा प्रस्ताव ठेवला. यावर समितीतील सर्व सदस्यांनी एकमताने प्रस्तावाला मंजूरी दिली. समितीने शरद पवार यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा फेटाळल्यानंतर आता स्वतः शरद पवार काय भूमिका घेतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

Img 20220425 wa0010282295345156635031542582

बैठकीनंतर समितीने पत्रकार परिषद निर्णयाची माहिती दिली. यावेळी प्रफुल्ल पटेल म्हणाले, “शरद पवार आपला निर्णय कार्यक्रमात जाहीर करतील याची अजिबात कल्पना नव्हती. यशवंतराव चव्हाण सभागृहात सर्वांनी आपली भावना व्यक्त केली. त्यानंतरही पक्षाचे ज्येष्ठ मान्यवारांनी शरद पवारांची भेट घेतली. शरद पवारांना तेव्हापासून विनंती करत राहिलो. देशाला, राज्याला आणि पक्षाला तुमची गरज आहे, अशी विनंती शरद पवारांना केली.”

“शरद पवारांनी कुणालाही विश्वासात न घेता राजीनाम्याचा निर्णय घेतला. यानंतर त्यांनीच नेमलेल्या समितीने त्यांची वारंवार भेट घेतली आणि आज यावर बैठक घेऊन एक ठराव मंजूर केला. यानुसार, शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा विचार केला होता. तो राजीनामा एकमताने नामंजूर करण्यात येत आहे. तसेच त्यांनीच अध्यक्ष म्हणून रहावं, अशी विनंती आम्ही करतो,” असं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं.

Img 20230503 wa00128836785746506742437

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये