राजकीय
माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा झटका

नवी दिल्ली : माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. हर्षवर्धन जाधव केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी गेले होते. तेथे त्यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला आहे.

नवी दिल्लीतल्या आर एम एल हॉस्पिटलमध्ये सध्या हर्षवर्धन जाधव यांच्यावर उपचार सुरू आहेत. हर्षवर्धन जाधव यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. हर्षवर्धन जाधव हे कन्नडचे माजी आमदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत. त्यांनी नुकताच तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या बीआरएस पक्षात प्रवेश केला आहे.






