पुणे शहर, जिल्हा

इंद्रायणी नदीवरील पूल अचानक  कोसळल्याने पर्यटक गेले वाहून..४ जणांचा मृत्यू

पुणे  : पुण्यात मावळ तालुक्यात धक्कादायक प्रकार घडला आहे. इंद्रायणी नदीवर असणारा लोखंडी पूल कोसळला असून  या घटनेत तब्बल 20 ते 25 जण वाहून गेले असल्याची माहिती मिळतं आहे. एन डी आर एफ चे जवान घटनास्थळी पोहोचले असून मदत कार्य सुरू करण्यात आले आहे. या घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला असून ५१ पर्यटक जखमी झाले आहेत.

मावळ तालुक्यात कुंडमळा हे पर्यटनासाठी प्रसिद्ध ठिकाण आहे.  पावसाळ्यात या ठिकाणी रोज असंख्य पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. येथे इंद्रायणी नदी ओलांडण्यासाठी एक पूल बांधलेला आहे. हाच पूल आज अचानक कोसळला.

Screenshot 20250508 083342 samsungnotes1092093488754539978

ही घटना घडताना तेथे अनेक पर्यटक आले होते जे त्या पुलावर होते. पूल कोसळल्यानंतर पर्यटक पाण्यात पडून वाहून गेले आहेत.  त्यातील काही पर्यटकांना बाहेर काढण्याचे काम चालू आहे. मिळालेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. घटनास्थळी एनडीआरएफचे जवान पोहोचले आहेत.  मदतकार्य केले जात आहे. नदीत वाहून गेलेल्यांना बाहेर काढण्याचे काम चालू आहे.

या दुर्घटनेत चंद्रकांत गुणाजी साठले (वय ४५, रा. हडपसर) रोहित सुधीर माने, (वय ३१), विहान रोहित माने (वय ५, रा. नक्षत्रम सोसायटी प्रेमलोक पार्क,चिंचवड पुणे) चेतन अण्णाप्पा चावरे (वय 23 इंद्रायणी कॉलनी तळेगाव दाभाडे) या चौघांचा मृत्यू झाला आहे.

Img 20240404 wa0013282295463184266198901191

शासनाच्या वतीने तत्काळ शोध आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असून पोलीस दल आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी उपस्थित आहेत. मोठ्याप्रमाणावर मदत कार्य सुरू असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीचीच वाट पाहावी. प्रशासनाचं प्राथमिक उद्दिष्ट सर्व पर्यटकांना शक्य तितक्या लवकर सुरक्षित स्थळी हलवण्याचं आहे. या संकटाच्या काळात आपण सर्वांनी संयम राखून प्रशासनाला सहकार्य करावं,असं  आवाहन आमदार सुनील शेळके यांनी केलं आहे.

३८ जणांचा बचाव..

आज रविवार, दिनांक १५/६/२०२५ रोजी दुपारी ३:३० च्या सुमारास हा लोखंडी पूल कोसळल्याची घटना घडली असून, सदर लोखंडी पुलाच्या ठिकाणी अंदाजे १०० पर्यटक वर्षा विहारासाठी आले होते. सदर दुर्घटनेमधून एकूण ३८ व्यक्तींचा बचाव करण्यात आला आहे. त्यापैकी १८ व्यक्ती जखमी झाले असून त्यांना रुग्णवाहिकेच्या मदतीने सोमाटणे फाटा, ता. मावळ येथील १)पवना रुग्णालय, २) मायमर हॉस्पिटल, ३) अथर्व हॉस्पिटल इत्यादी हॉस्पिटल मध्ये उपचाराकरीता दाखल केले आहे. उपचारा दरम्यान ०२ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. पूलाच्या कोसळलेल्या भागाखाली नदीपात्राच्या पाण्यात एकूण ०३ व्यक्ती अडकले असल्याचे प्राथमिक माहिती आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF)चे २ पथक, आपदा मित्र, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि PMRDA चे अग्निशमन दल व स्थानिक मदत बचाव संस्था इत्यादी घटनास्थळी दाखल झाले आहेत, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून प्राप्त झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये