जो बायडेन अमेरिकेचे नवे अध्यक्ष

सर्व जगाचे लक्ष लागलेल्या अमेरिकेच्या अध्यक्ष पदाच्या अटीतटीच्या लढतीत डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन यांनी रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर मात केली आहे. जो बायडेन हे आता अमेरिकेचे ४६ वे अध्यक्ष बनले आहेत. पेनसिल्वेनियातील २० निर्णायक प्रातिनिधिक मतांच्या जोरावर शनिवारी रात्री बायडेन यांना विजयी घोषित करण्यात आले. अमेरिकेतील वृत्तवाहिनीने याबाबतचे वृत्त प्रसारित केले आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष कोण बनणार याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. चार दिवस सुरू असलेल्या मतमोजणीत लढत अटीतटीची होणार असल्याचे दिसून आले. अखेर बायडेन यांनी विजय मिळवत ट्रम्प यांना चितपट केले आहे. बायडेन यांना २७९ तर ट्रम्प यांना २१४ मते पडली आहेत.



जो बायडेन यांनी मतमोजणीत चांगलीच आघाडी घेतली होती. तर ट्रम्प मतमोजणीत पिछाडीवर पडल्याचे पाहिला मिळत होते. पण अंतिम मतमोजणी पर्यंत काय होणार हे सांगणे कठीण होते. पेनसिल्वेनिया आणि जॉर्जिया या दोन राज्यात जो बायडेन यांना निर्णायक मते मिळाल्याने त्यांचा विजय सुकर झाला.
कमला हॅरिस देखील अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्या आहेत. अमेरिकेच्या पहिल्या भारतीय वंशाच्या उपराष्ट्राध्यक्षा म्हणून त्यांच्या नावे विक्रम प्रस्थापित झाला आहे.
America, I’m honored that you have chosen me to lead our great country.
— Joe Biden (@JoeBiden) November 7, 2020
The work ahead of us will be hard, but I promise you this: I will be a President for all Americans — whether you voted for me or not.
I will keep the faith that you have placed in me. pic.twitter.com/moA9qhmjn8
मला अभिमान आहे की आपण महान देशाचे नेतृत्व करण्यासाठी मला निवडले आहे. आपल्या पुढील कामे कठोर आहेत, परंतु मी तुम्हाला वचन देतो की, मी सर्व अमेरिकन लोकांचा अध्यक्ष होईन. तूम्ही माझ्यावर जो विश्वास ठेवला आहे तो मी सार्थ ठरवील. अशा भावना जो बायडेन यांनी ट्विटर द्वारे व्यक्त केल्या आहेत.



