राष्ट्रीय
शरद पवार राष्ट्रपतींना भेटणार ; सोबत विविध पक्षाचे शिष्टमंडळ

नवी दिल्ली : शेतकरी कायदा विरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन दहा दिवस झाले चालू आहे. आता या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेही . उतरणार आहेत. केंद सरकारने हटवादीपणा सोडावा असे मत पवार यांनी मांडले असून नऊ तारखेला राष्ट्रपतींना भेटणाऱ्या एका शिष्टमंडळात ते सहभागी होणार आहेत. या भेटीत कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी,डी राजा हेही शिष्टमंडळात असतील.
शेतकरी आंदोलक आणि केंद्र सरकारचे प्रतिनिधी यांच्यातील चर्चेच्या फेऱ्या निष्फळ ठरल्या आहेत. पुढील बैठक ९ डिसेंबर रोजी होणार आहे. त्या अगोदर आठ तारखेला भारत बंदची हाक शेतकरी आंदोलनातील ४० संघटनांनी दिली आहे.शेतकरी आंदोलकांच्या भारत बंदला कॉंग्रेस, तृणमूल काँग्रेस, आम आदमी पार्टी,तेलंगण राष्ट्र समिती यांनी पाठिंबा जाहीर केला आहे.







