कोथरुड

कर्वेनगरमध्ये महिला दिनानिमित्त सफाई कर्मचारी महिलांचा सन्मान…

कर्वेनगर : कर्वेनगर प्रभाग क्रमांक 31 मध्ये जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर यांच्या वतीने पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या सफाई कर्मचारी तसेच कचरावेचक महिलांचा साडी आणि चोळी, व मानाचे श्रीफळ ,गुलाब पुष्प देऊन नगरसेविका लक्ष्मी  दुधाने यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. Honoring women cleaners on the occasion of Women’s Day in Karvenagar …

यावेळी पौर्णिमा केसवड, अंजली साकळे, उमा हुले, दादा आठवले, मंगेश नवघणे, आनिल कडू, ब्रह्मानंद टाक, पुणे महानगरपालिकेचे मुकादम अंकुश साठे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण समिती पुणे शहर उपाध्यक्ष केदार मारणे यांनी केले होते.

Img 20210308 wa0096

यावेळी केदार मारणे म्हणाले, आपण सर्व सामाजिक व  राजकीय कार्यकर्ते दररोज या महिलांना स्वच्छतेची कामे सांगत असतो आणि त्याही ही कामे प्रामाणिकपणे करत असतात. सकाळी सहा वाजता त्या आपल्या भागात येऊन कामास सुरुवात करतात. चूल आणि मूल या जबाबदाऱ्या पार पाडून आपला परिसर स्वच्छ राहावा म्हणून त्या मेहनत घेत असतात. त्यांच्यामुळे परिसरातील नागरिक निरोगी राहतात. त्यांचे कार्य समाजासाठी फार मोलाचे आहे, म्हणून या महिला भगिनींचा महिला दिनाचे औचित्य साधत साडी आणि चोळीचा मान देऊन सन्मान केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये