पंडित दिनदयाळ शाळेत सुरू करण्यात आलेल्या लसीकरण केंद्राचे चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन..

नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्या पुढकाराने लसीकरण केंद्र सुरू
कोथरुड : लसीच्या उपलब्धतेनुसार लवकरच सर्वांचे लसीकरण करण्यावर भर दिला पाहिजे तसेच कोरोना वर मात करायची असेल तर Early detection & Early treatment महत्वाचे असल्याचे मत भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
शिक्षण समिती अध्यक्ष नगरसेविका मंजुश्री खर्डेकर व भाजप प्रवक्ता संदीप खर्डेकर यांच्या प्रयत्नातून पंडित दीनदयाळ उपाध्याय शाळेत सुरु करण्यात आलेल्या लसीकरण केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
पाटील म्हणाले, जितक्या लवकर आपण संसर्ग झालेली व्यक्ती identify करू आणि त्यांच्यावर उपचार सुरु करू तितक्या लवकर कोरोना वर मात करणे शक्य होईल. भाजप पुणे शहराच्या वतीने सुरु असलेल्या सेवा कार्याची माहिती पाटील यांनी यावेळी दिली.
नगरसेविका मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या. या भागातील बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचे नातेवाईक परदेशी असून त्यांची सोय व्हावी यासाठी हे केंद्र सुरु करण्याबाबत मी आग्रही होते. हे केंद्र सुरु करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, डॉ वैशाली जाधव, डॉ अंजली साबणे व वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्य्क आयुक्त संतोष वारुळे यांनी सहकार्य केले असून प्रशासन लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे त्या म्हणाल्या.

पौड फाट्यावरील पंडित दीनदयाळ उपाध्याय शाळेत आजपासून लसीकरण केंद्र सुरु झाले यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे धनंजय काळे, नगरसेवक राजेश बराटे, दीपक पोटे, जयंत भावे, माधुरी सहस्त्रबुद्धे, स्वीकृत सदस्य मिताली सावळेकर, भाजपचे कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, शहर चिटणीस प्रशांत हरसूले, महिला आघाडी अध्यक्ष हर्षदा फरांदे, ओबीसी आघाडी अध्यक्ष रमेश चव्हाण, प्रभाग अध्यक्ष राजेंद्र येडे,डॉ. दीपक पखाले, डॉ. अरुणा तारडे, डॉ. शाहीन शेख, डी एस आय गणेश खिरीड,आरोग्य निरीक्षक राहुल शेळके आदी उपस्थित होते.
भाजप प्रवक्ता संदीप खर्डेकर म्हणाले, भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता हा सेवा कार्यात व्यग्र असून आमचे लोकप्रतिनिधीच नव्हे तर सर्वजण जे जे शक्य आहे ते ते करत आहेत. Early detection, Early treatment बरोबरच Early Isolation ही महत्वाचे आहे. बाधीत रुग्ण बिनधास्तपणे फिरत असून त्या मुळे कोरोना चा संसर्ग वेगाने वाढत आहे, तसेच चाचणीचा अहवाल यायला दोन दिवस लागत असून त्या दरम्यान बाधित रुग्ण विलगीकरणात जातं नसल्याने ते संसर्ग पसरविण्यास कारणीभूत ठरत असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
या केंद्रावर ज्येष्ठ नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांना मदत करण्यासाठी प्रभाग सरचिटणीस बाळासाहेब धनवे, अॅड प्राची बगाटे, महिला आघाडीच्या गौरी करंजकर, संगीता आदवडे,जयश्री तलेसरा, मंगलताई शिंदे,रमाताई डांगे, उपेंद्र भोमें, कल्याणी खर्डेकर यांची टीम अविरत काम करणार आहे.



