कोथरुड

वस्ती विभागात विशेष लसीकरण मोहीम राबवल्याने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यास मदत होणार : हर्षवर्धन मानकर

कोथरुड : pune city, kothrud वस्ती विभागात विशेष लसीकरण मोहीम राबवण्यात आल्याने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठी मदत मिळणार असल्याचे दीवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व राष्ट्रवादीचे हर्षवर्धन मानकर यांनी सांगितले. Special vaccination campaign in slums will help prevent corona outbreak: Harshvardhan Mankar

मानकर म्हणाले, शहरात लसीकरण मोठ्या प्रमाणावर सुरू आहे, पण लसीकरणाबाबत काही अफवा पसरल्याने वस्ती विभागातील अनेक नागरिकांनी लसीकरण केले नव्हते, पण जनजागृती करून वस्ती विभागात विशेष लसीकरण मोहीम राबवण्यात आल्याने कोरोना रोखण्यासाठी फायदा होणार आहे.

Fb img 1631014229082

प्रभाग क्रमांक ११ मधील केळेवाडी हनुमाननगर, मेगासिटी भागात नगरसेवक दीपक मानकर यांच्या प्रयत्नातून महानगरपालिकेच्या वतीने  राबवण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेत मोठ्या प्रमाणात वस्ती विभागातील नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता लसीकरण करून घेण्याचे आवाहन हर्षवर्धन मानकर यांनी केले आहे.

Img 20210818 wa0002

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये