राष्ट्रीय

इमारत कोसळून 4 जणांचा मृत्यू; बचाव कार्य सुरू

नवी दिल्ली : दिल्लीतील बवाना येथे इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे. तरीही शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. मृत्युमुखी पडलेल्या चौघांमध्ये रुकैया खातून, शहजाद, 12 वर्षांची मुलगी आफरीन आणि दानिश यांचा समावेश आहे. यासोबतच 2 जखमीही आहेत, ज्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. फातिमा आणि शहनाज अशी जखमींची नावे आहेत.

Screenshot 2022 01 29 09 52 08 45

इमारत अचानक कोसळल्याने आणखी दोन ते तीन लोक अडकल्याची भीती आहे. जखमी अवस्थेत 2 जणांना बाहेर काढण्यात आले आहे. दिल्ली जल बोर्डजवळ एक इमारत कोसळली अशी माहिती नरेला पोलीस स्टेशनला मिळाली. ज्यामध्ये 4 ते 5 लोक आणि मुले ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती आहे. पोलीस स्टेशन नरेला घटनास्थळी पोहोचले तेव्हा असे आढळून आले की, इथं पडलेला फ्लॅट राजीव रतन निवासस्थानाचा भाग आहे, ज्यात सुमारे 300 ते 400 फ्लॅट आहेत. पोलिसांनी तीन जेसीबी आणि एक हायड्रा आणि दोन रूग्णवाहिकांच्या मदतीने मदत आणि बचाव कार्य सुरू केलेले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये