राजकीय

संजय राऊत यांच्या पोकळ धमक्यांना घाबरत नाही : चंद्रकांत पाटील

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पोकळ धमक्यांना आम्ही घाबरत नाही, असे प्रत्युत्तर देत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राऊत यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी ते तपास यंत्रणांकडे द्यावेत. अन्यथा न्यायालयात जावे, असे म्हटले आहे.

Screenshot 2022 01 29 09 52 08 45

राऊत यांचे आरोप म्हणजे ‘ डोंगर पोखरुन उंदीर निघाला, ’ असा टोला पाटील यांनी लगावला आहे. नुसते आरोप केल्याने काहीच होत नाही. एखादा माणूस अडचणीत आल्यावर कसा थयथयाट करतो, असे राऊत यांचे वर्तन दिसल्याचे पाटील म्हणाले. पत्रकार परिषदेसाठी खूप वातावरण निर्मिती केली, पण गर्जेल तो पडेल काय, असे झाल्याचे त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये