अर्थजगत

शॅम्पूंचा वापर करत असाल तर सावधान! ब्लड कॅन्सरचा धोका, या कंपनीने परत मागवली सर्व उत्पादनं

वॉशिंग्टन : अमेरिकेत युनिलीव्हरने Dove सहित एयरोसोल ड्राय शॅम्पूसहित अनेक प्रसिद्ध ब्रॅँड्सची उत्पादनं बाजारातून परत मागवली आहेत. कंपनीच्या अनेक शॅम्पू उत्पादनांमध्ये बेंजीन नावाचं एक धोकादायक रासायनिक द्रव्य आढळलं आहे, ज्यामुळे कॅन्सर होण्याचा धोका आहे. कंपनीने Dove, Nexxus, Suave, Tigi आणि Tresemme एयरोसोलसहित अमेक ड्राय शॅम्पू अमेरिकेतील बाजारातून परत मागवले आहेत.

Screenshot 2020 1113 1558146592854911118712363

अमेरिकेत अन्न व औषध प्रशासनाने आपल्या वेबसाईटवर नोटीस जारी केली असून त्यानुसार, Nexxus, Suave, Tigi या ब्रँडचा यामध्ये समावेश आहे जे रॉकहोलिक आणि बेड बेड ड्राय शॅम्पूचं उत्पादन करतात. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, युनिलीवरने ऑक्टोबर २०२१ च्या आधीची सर्व उत्पादनं परत मागवली आहेत. या वृत्तामुळे पुन्हा पर्सनल केअर उत्पादनांच्या सुरक्षेसंबंधी प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. गेल्या दीड वर्षात एयरोसोल सनस्क्रीन ज्याप्रमाणे जॉन्सन अँड जॉन्सनच्या न्यूट्रोगेना, एडजवेल पर्सनल केअर कंपनीच्या बनाना बोटसंबंधीही अशा बातम्या समोर आल्या आहेत. रिपोर्टनुसार, प्रॉक्टर अँड गॅम्बल (P&G) कंपनीने बेंजीनचं मिश्रण असल्याचा हवाला देत आपले पँटीन आणि हर्बल एसेंस ड्राय शॅम्पू परत मागवले होते.

Img 20221024 wa0580

ड्राय शॅम्पू हे स्प्रेप्रमाणे असतात. आपले केस ओले न करता ते स्वच्छ करण्यासाठी अशा प्रकारच्या उत्पादनांचा वापर केला जातो. स्प्रे-ऑन ड्राय शॅम्पूवर प्रश्चचिन्ह उपस्थित होण्याची ही पहिलीच वेळ नाही. युनिलीवरने आपल्या उत्पादनांमध्ये बेंजीनचं प्रमाण किती आहे याबाबत माहिती दिलेली नाही, मात्र आपली सर्व उत्पादनं परत मागवली आहेत.

Fb img 1666600270584

सतत बेंजीनच्या संपर्कात आल्याने आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचं अन्न व औषध प्रशासनाने सांगितलं आहे. यामुळे ब्लड कॅन्सर होण्याचा धोका असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

Png 20221024 133102 0000 1
Fb img 1666593719680
Img 20221024 wa0044871667030408772591
Wp image3090221943230277582
Img 20211031 wa00066985050640051471264
Wp image5754610395278315591
Wp image3174907213333936817
Img 20221021 wa0325
Img 20221020 wa00016316249401933390448
Img 20211101 wa00118330850860855581379
Img 20221021 wa0478
Img 20221021 wa0473
13bbf55a 43bc 4d02 818a 2d982285f761 1
Img 20221023 wa0081
Img 20221021 wa0475
Img 20221022 wa0300
Img 20221023 wa0082
Fb img 1666533939031
Screenshot 2022 10 23 18 39 25 76
Img 20221022 104615 9662214124455291312590
Img 20221022 104611 6206281284427559282707
Img 20221022 104558 1014877655567210833323
Img 20221021 wa0416
Img 20221021 wa00118605235200493211119
Img 20221019 143448 4921652329476299347948
Img 20221021 wa00011331728156984263886
Img 20221020 wa00071429831687423321840

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये