पुणे शहर
पुण्यात सर्व शाळा-महाविद्यालये बंदच राहणार – महापौर मुरलीधर मोहोळ

पुणे : कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता पुण्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंदच ठेवण्याचा निर्णय आज झालेल्या पालकमंत्र्यांच्या कोरोना आढावा बैठकीत घेण्यात आला. पुढील बैठकीत रुग्णसंख्येचा आढावा घेऊन याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
जलतरण तलाव सुरु !
पुणे शहरातील जलतरण तलाव सुरु करण्याचा निर्णय पालकमंत्री कोरोना संसर्ग आढावा बैठकीत घेण्यात आला असून दोन डोस घेतलेले नागरिक आणि स्पर्धांसाठी तयारी करणारे खेळाडू यांनाच जलतरण तलावात प्रवेश असणार आहे.
उद्याने सकाळच्या सत्रात सुरु राहणार !
पुणे मनपा हद्दीतील उद्याने सकाळच्या सत्रात सुरू करण्याचा निर्णय आज झालेल्या पालकमंत्री कोरोना संसर्ग आढावा बैठकीत घेण्यात आला आहे. याबाबतचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल.







