राष्ट्रीयसांस्कृतिक

लता मंगेशकर यांची प्रभू कुंज इमारत का करण्यात आली सील ?

मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे राहते घर असलेली प्रभू कुंज इमारत मुंबई महापालिकेकडून सील करण्यात आली आहे. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली तसेच त्यांच्या चाहते घराजवळ जाऊन चौकशी करायला लागले. त्यांचे फोन मेसेज ऐवढे वाढले की शेवटी मंगेशकर कुटुंबाला पत्र काढून याबाबतची माहिती द्यावी लागली. आपल्या अधिकृत पत्रकात कुटुंब असं म्हणत की प्रभू कुंज इमारतीत मंगेशकर कुटुंबातील सदस्यांसह अनेक जेष्ठ नागरिक राहत आहेत. मुंबई महापालिकेने उचललेले हे पाऊल आमच्या सुरक्षिततेसाठी आहे.

कोरोनामुळे यंदाचा मंगेशकर कुटुंबियांचा गणेशोत्सव अगदी घरगुती पद्धतीने साजरा होतोय. सरकारने घालून दिलेले सगळे नियम मंगेशकर कुटुंबीय पाळत आहोत. देवाच्या कृपेने आणि तुम्हा सर्व चाहत्यांचे शुभेच्छांमुळे आम्हा सर्वांची तब्येत उत्तम आहे. कृपया कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. आमच्या इमारतीत आमच्या कुटुंबातल्या सदस्यांसहित इतर ज्येष्ठ नागरिकांची योग्य काळजी घेतली जात आहे. काळजी करण्याचं काहीच कारण नाही.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये