राजकीय

निधी शून्य आणि श्रेय घेण्यासाठी उठाठेव भाजपची वडगावशेरीच्या आमदारांवर सडेतोड टीका

पुणे:  भामा-आसखेड प्रकल्प पूर्णत्वास येत असताना न केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करणार्‍या वडगावशेरीच्या विद्यमान आमदारांनी या प्रकल्पासाठी शून्य निधीची तरतूद केली. त्यामुळे या योजनेचे श्रेय घेण्याची धडपड त्यांनी करू नये अशी टीका शहर भाजपचे अध्यक्ष माजी आमदार जगदीश मुळीक यांनी केली.

मुळीक म्हणाले, ‘भामा-आसखेड प्रकल्पाचे काम गेल्या सहा वर्षांपासून सुरू आहे. गेल्या वर्षी निवडणुकीपूर्वी ९५ टक्के काम पूर्ण झाले होते. आम्ही सातत्यपूर्ण पाठपुरावा करून, बैठका घेऊन या योजनेला गती दिली. स्थायी समितीचे तत्कालिन अध्यक्ष योगेश मुळीक यांनी  सुमारे १८५ कोटी रुपयांची तरतूद केली. त्यातून प्रकल्पग‘स्तांचे पुनर्वसन आणि प्रकल्पग‘स्त गावांमध्ये विकासकामे झाली. मी स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांना सुचना देऊन या वर्षीच्या महापालिकेच्या अंदाजपत्रकात आवश्यक असणारी तरतूद करण्यास सांगितले. त्यामुळे योजना पूर्णत्वास येत आहे. काही प्रकल्पग‘स्तांना हेक्टरी १५ लाख रुपये देऊन त्यांनी पुनर्वसन करण्याचा निर्णय तत्कालिन मु‘यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला होता. तशीच कार्यवाही निवडणुकीनंतर झाली आणि काम सुरू झाले. परंतु गेल्या वर्षभरात मतदारसंघात एकही विकासकाम करता आले नाही आणि शून्य निधीची तरतूद यामुळे निराश झालेले विद्यमान आमदार न केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत.’

Img 20201114 wa0195

मुळीक पुढे म्हणाले, ‘या प्रकल्पासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार, पुणे महानगरपालिका आणि पिंपरीचिंचवड महानगरपालिका यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे. बहुतांश निधी भाजप सत्तेत आल्यानंतरच उपलब्ध करून देण्यात आला. त्यामुळे प्रकल्पाला गती प्राप्त झाली. परंतु राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी प्रकल्पग‘स्तांना जमिनीपोटी जमिनच घ्यावी अशी चिथावणी दिली. त्यांना न्यायालयात जाण्यास उद्युक्त केले. यामुळे योजनेचे काम वारंवार बंद पडण्यात झाले. त्यामुळे १०० कोटी रुपयांनी खर्च वाढला. पुणेकरांना पाणी मिळू देणार नाही, अशा धमक्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी दिल्या. आता मात्र श्रेय लाटण्याचा प्रयत्न सुरू आहे.’

Whatsapp image 2020 11 13 at 2. 39. 13 pm

मुळीक पुढे म्हणाले, ‘सहा वर्षे सुरू असलेल्या योजनेचे एका वर्षात श्रेय घेण्याचा हास्यास्पद प्रयत्न विद्यमान आमदार करीत आहेत. परंतु ते नगरसेवक असलेल्या प्रभाग क‘मांक दोन मधील या योजनेअंतर्गत २० लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचे काम अर्धवट अवस्थेत बंद पडले आहे. टाकीचे बांधकाम करण्यासाठी आणलेले साहित्य चोरीला गेले आहे. टाकीचे रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी नगरसेवक आणि आमदार या नात्याने त्यांनी काहीही प्रयत्न केलेले नाहीत. त्यातून त्यांची निष्कि‘यता लक्षात येते. त्यांनी आधी योजनेअंतर्गत आपल्या प्रभागातील टाकीचे काम पूर्ण करावे आणि नंतर न केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करावा, टाकीचे काम पूर्ण झाले नाही तर या भागातील नागरिकांना पाणीच मिळणार नाही. अशा अडथळ्यांवर मात करीत भाजपने हे काम पूर्णत्वास आणले असून, विद्यमान आमदारांनी त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये.’

Img 20201118 wa0057

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये