पुणे शहर

पुण्यात जुन्या इमारतीचे छत कोसळून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू, एक जखमी

पुणे : दस्तुर मेहेर रस्त्यावरील एक जुन्या इमारतीचे छत पावसाने कोसळून ढिगाऱ्याखाली अडकल्याने एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला आहे. रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. स्टॅनली डिसूजा (वय 57) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर जेरी डिसूजा (वय 46 ) हे या दुर्घटनेत जखमी झाले आहेत.

Img 20220425 wa001080841499313169957854513307260893077682

कॅम्प भागातील दस्तुर मेहेर रस्त्यावर घर क्र. ८३० मध्ये स्टॅन्ली डिसुझा परिवारासह वास्तव्यास आहेत. सकाळपासून या भागात पाऊस होता. डिसुझा बंधू हे घरात हॉलमध्ये खुर्चीवर बसले होते तर महिला व इतर कुटुंबीय आतील खोलीमध्ये होते. अचानक साडेसात वाजण्याच्या सुमारास घरातील पहिल्या मजल्याचे ( टेरेसचे) छत कोसळून तळमजल्याच्या छतावर पडले. तळमजल्याचा छताचा संपूर्ण भाग हा खाली बसलेल्या स्टॅन्ली डिसुझा यांच्या अंगावर कोसळला. सिमेंट व मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्यामुळे ते गंभीर जखमी झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना ढिगार्‍याखालून बाहेर काढून तातडीने उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ढिगाऱ्याचा काही भाग बाजूला बसलेल्या जेरी डिसुझा यांच्या अंगावर पडल्याने ते देखील जखमी झाले आहेत. या दुर्घटनेची माहिती मिळताच पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अभियंता सुखदेव पाटील घटनास्थळी भेट दिली. महावितरणने दुर्घटनाग्रस्त इमारतीचा विद्युतपुरवठा बंद केला आहे. दुर्घटनेतील जखमी व्यक्तीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुण्यातील जुन्या इमारतींचा प्रश्न या निमित्ताने पुन्हा चर्चेत आला आहे.

Fb img 16837376233493064729888638918603

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये