राजकीय

दुसरा व्हिडीओ बॉम्ब उद्या-परवा येतोय : चंद्रकांत पाटील

पुणे : केंद्रीय तपास यंत्रणांकडून तुम्ही आम्हाला त्रास देता म्हणून आम्ही तुम्हाला त्रास देतो असं सुरु आहे. देवेंद्र फडणवीस यांनी एक व्हिडीओ बॉम्ब टाकला. एका व्हिडीओ बॉम्बमुळे सगळं चिडीचूप झालंय. दुसरा व्हिडीओ उद्या-परवा येतोय. दुसरा व्हिडीओ तर खूपच स्ट्राँग आहे. फडणवीस यांच्या पाठीमागे पूर्ण भाजप तसेच जनता आहे, असं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

फडणवीस यांना मुंबईतील वांद्र-कुर्ला पोलिसांनी बजावलेली नोटीस तसेच त्यांची होत असलेली चौकशी यावरही पाटील यांनी भाष्य केलं आहे ते म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. फडणवीस विरोधी पक्षनेते असल्यामुळे कायद्याप्रमाणे त्यांना माहितीचा सोअर्स कोठून मिळाला हे विचारता येत नाही. मात्र त्यांना ही माहिती कोठून मिळाली हे विचारण्यासाठी चौकशीला बोलवलं आहे. लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्षावर अंकुश ठेवण्यासाठी विरोधी पक्षाची निर्मिती झाली. घटनेप्रमाणे विरोधी पक्षनेत्याला मुख्यमंत्र्याच्या प्रमाणे दर्जा आहे. त्यामुळे त्याला माहिती कोठून मिळाली हे विचारायचं नसतं. मात्र अंधेर नगरी चौपट राजा असा प्रकार सुरु आहे,” अशी टीका चंद्रकांत पटील यांनी सत्ताधाऱ्यांवर केली.

Screenshot 2022 01 29 09 52 08 45

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये