पुणे शहर

पॉप्युलर – गिरीधरनगर सोसायटीच्या अध्यक्षपदी महादेव पवार यांची निवड

वारजे : वारजेतील सर्वात मोठी सोसायटी असलेली पॉप्युलर गिरीधर नगर फेडरेशनच्या पंचवार्षिक निवडणुकीत पहिल्यांदाच सर्व नवीन सदस्य निवडून आले आहेत. या 11 सदस्या मधून रविवारी (ता.30) सोसायटीच्या अध्यक्ष पदी महादेव पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे.

यामध्ये सचिव म्हणून संदीप पारखी तर खजिनदार म्हणून रविद्र सुतार यांची बिनविरोध निवड झाली आहे. सर्वसाधारण गटातून संदीप पारखी, दिनेश भिलारे, रविंद्र सुतार, महादेव पवार, बाबुराव दोडके, विजय देसाई यांनी बाजी मारली. तर राखीव गटातून आशिष क्षिरसागर, संतोष ढाकणे व निळकंठ शिंदे यांनी आपआपल्या गटातून निवडणूक जिंकली. महिला गटातून भावना पाटील व विजया डुंबरे यांनी बिनविरोध सदस्य म्हणून निवड झाली होती.

Img 20230731 wa0012
Screenshot 2023 0731 1157582306165004298474994

रविवारी ( ता. 30 ) निवडणूक निर्णय अधिकारी नितीन साळुंके यांच्या अध्यक्षतेखाली पॉप्युलर – गिरीधर नगर सोसायटीच्या अध्यक्षाची निवड करण्यात आली. यावेळी अध्यक्ष पदासाठी महादेव पवार, सचिव पदासाठी संदीप पारखी व खजिनदार पदासाठी रविद्र सुतार यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध झाली.

Img 20230717 wa0012
Img 20230511 wa000228129

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये