कोथरुडमध्ये पर्यावरणपूरक आकाश कंदील व किल्ले स्पर्धेत सहभागी होत मुलांनी दिला स्वच्छतेचा संदेश..

कोथरुड : pune city, Kothrud “स्वच्छ भारत अभियान स्वच्छ सर्वेक्षण मिशन २०२१ – २०२२” स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिका कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय, आरोग्य विभागाच्या वतीने जनवाणी सहकारी संस्था कमिन्स इंडिया लिमिटेड कंपनी, सेवा सह्योग फाउंडेशन, क्रिश डान्स अकॅडमी या स्वयंसेवी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने प्रभाग क्रं. १२, डहाणूकर कॉलनी, कोथरूड गावठाण हजेरी कोठी अंतर्गत लक्ष्मीनगर वसाहतीमध्ये शून्य कचरा प्रकल्पांतर्गत पर्यावरण पूरक किल्ले स्पर्धा व आकाश कंदील बनविण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून मुलांना व नागरिकांना स्वच्छतेचा व कोणताही सण साजरा करत असताना पर्यावरण पूरक व निसर्गनिर्मित वस्तूंचा वापर करण्याचा संदेश दिला जातो. तसेच मानवी जीवनामध्ये निसर्ग किती महत्त्वाची भूमिका बजावतो याविषयी जनजागृती केली जाते.



आधुनिक कालखंडामध्ये दिवाळी हा सण साजरा करत असताना सर्रास नागरिक हे फायबर व प्लास्टर ऑफ पॅरिस चे किल्ले तसेच प्लास्टिक व थर्माकोल पासून तयार केलेले आकाश कंदील आणून आपल्या पाल्यांना देतात. त्या वस्तूंचा वापर झाला की कचऱ्या मध्ये टाकल्या जातात. परत या वस्तू कचर्यात लवकर समाविष्ट होत नाहीत, त्यामुळे पर्यावरणास व मानवाच्या आरोग्याला विघातक परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे या जनजागृती पर स्पर्धेचे आयोजन केले जाते.



स्पर्धेला व कार्यशाळेला लागणारे साहित्य कमिन्स इंडिया लिमिटेड जनवाणी व सेवा सह्योग फाउंडेशन या संस्थेने उपलब्ध करून दिले. या किल्ले स्पर्धेमध्ये क्रिश डान्स अकॅडमीचे प्रमुख कृष्णा शिंदे यांनी लक्ष्मीनगर मधील १५० मुलांना सहभागी करून घेण्यासाठी विशेष प्रयत्न केले. तसेच या मुलांनी सिंहगड, तोरणा गड, जंजिरा, शिवनेरी, प्रतापगड, विशाळ गड, रायगड व भुईकोट किल्ले तयार केले. या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमास पुणे महानगरपालिका कामगार युनियनचे विभागीय अध्यक्ष कॉ. धनंजय आयवळे, कॉ. राम अडागळे व सुदिक्षा फाउंडेशनच्या उमा मॅडम सहभागी झाल्या होत्या. ४० विद्यार्थ्यांनी पर्यावरण पूरक आकाश कंदील बनविण्याच्या कार्यशाळेमध्ये सहभाग घेतला व प्रत्येकाने पुठ्ठा रंगीत कागद गोठीव कागद, गम, लोकरी दोरा यापासून सुबक व सुंदर आकर्षक आकाश कंदील बनवले. कार्यशाळेत युवराज चाबुकस्वार, दिव्या जाधव यांनी प्रशिक्षकाची भूमिका बजावली तसेच अनुष्का शेट्टी, राजश्री वारे, सचिन शेख, शितल घोडके, दिव्या साळुंखे, अल्लाउद्दीन शेख, सानिका शेटे यांनी उत्कृष्ट आकाश कंदील बनवले.
ही स्पर्धा महापालिका सहाय्यक आयुक्त सचिन तामखडे यांच्या मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राम सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये आरोग्य निरीक्षक सचिन लोहकरे, करण कुंभार हनुमंत चाकणकर, रूपाली शेडगे, यांच्या निरीक्षणाखाली मोकादम वैजीनाथ गायकवाड अण्णा ढावरे जनवाणीचे समीर अजगेकर, जयश्री पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. सदर कार्यकमाची सांगता !! फटाके मुक्त दिवाळीची शपथ घेऊन करण्यात आला.
ही पर्यावरण पूरक किल्ला स्पर्धा व आकाश कंदील बनविण्याच्या कार्यशाळेचे आयोजन दरवर्षी दिवाळी सणाच्या प्रारंभीच्या काळात कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत असते. आणि मुलेही उत्स्फूर्त पणे या स्पर्धेत सहभागी होत असतात. स्पर्धेचे यंदाचे हे पाचवे वर्ष आहे.



