पुणे शहर

“पुणेकर भाजपला नक्कीच जागा दाखवतील” टिळक कुटुंबीयांच्या भेटीनंतर रविंद्र धंगेकरांचं विधान!

पुणे : कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून रविंद्र धंगेकराना उमेदवारी जाहीर झाली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी रविंद्र धंगेकरानी केसरीवाडा येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.त्यानंतर मुक्ता टिळक यांच्या निवासस्थानी जाऊन शैलेश टिळक यांची भेट घेतली. तसेच मुक्ता टिळक यांच्या प्रतिमेला अभिवादन देखील केले. यावेळी रविंद्र धंगेकर यांना शैलेश टिळक यांनी निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या.

यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना रविंद्र धंगेकर म्हणाले, मला काल रात्री नाना पटोले यांचा फोन आला. उद्या उमेदवारी अर्ज दाखल करायचा असून त्याच्या तयारीला लागा असं म्हणाले. त्यानुसार मी केसरी वाडा येथे मुक्ता टिळक यांच्या घरी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि मुक्ता टिळक यांच्या प्रतिमेलादेखील अभिवादन केले. मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला उमेदवारी द्यावी अशी भावना पुणेकर नागरिकांची होती. मात्र भाजपकडून उमेदवारी देण्यात आली नाही. ही नाराजी शहरातील नागरिकांमध्ये आहे. भाजपा ही निवडणुक मतदारांना गृहीत धरून लढवित आहे. त्यामुळे पुणेकर नागरिक भाजपला नक्कीच जागा दाखवतील.

Fb img 1647413711531 1
पुण्यात लवकरच रस्त्यावर धावणार ही डबल डेकर बस पहा व्हिडिओ

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये