राष्ट्रीय

कॉमेडियन श्याम रंगीलाचा ‘आप’मध्ये प्रवेश

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मिमिक्रीमुळे प्रसिद्ध झालेला कॉमेडियन श्याम रंगीलाने आम आदमी पक्षामध्ये प्रवेश केला आहे. आपचे राजस्थानचे प्रभारी विनय मिश्रा यांनी श्याम रंगीलाला पक्षाचे सदस्यत्व दिले. 

आम आदमी पक्षाच्या कार्याचे कौतुक करताना श्याम रंगीला म्हणाला की, “इतर पक्षांप्रमाणे ते आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण करत नाहीत. पंजाबमध्ये नुकत्याच झालेल्या विजयापूर्वीही मी ‘आप’ला पाठिंबा देत होतो. याचे कारण त्यांनी दिल्लीत केलेले काम आहे.”

आम आदमी पक्षाशिवाय असा कोणताही पक्ष किंवा नेता पाहिला नाही, जो म्हणतो की, तुम्हाला माझे काम आवडत नसेल, तर पुढच्या वेळी मला मत देऊ नका. त्यांच्यामुळे मी प्रभावित झालो आणि त्यामुळेच मी पक्षात प्रवेश करत आहे, असे श्याम रंगीलाने म्हटले आहे.

श्याम रंगीला आपल्या कलेतून आम आदमी पक्षाच्या वतीने आरोग्य आणि शिक्षण क्रांतीबद्दल लोकांना सांगणार असून त्यांना जागरूक करण्याचे काम करणार आहे. आम आदमी पार्टी देशात कामाचे राजकारण करत आहे, असे ‘आप’ने याबाबतच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Img 20220425 wa00102978251768482543832

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये