राष्ट्रीय
धनाच्या हव्यासापोटी लहान मुलाचे अपहरण करून बळी

सिल्वासा : धनाच्या हव्यासापोटी नऊ वर्षांच्या मुलाचे अपहरण करून त्याचा बळी देत नंतर त्याच्या शरीराचे तुकडे केल्याची घटना दादरा नगर हवेलीमध्ये घडली आहे. अत्यंत निघृण पद्धतीने करण्यात आलेल्या या हत्येमध्ये १०० हून अधिक जण सहभागी असल्याचे दादरा आणि नगर हवेलीच्या पोलिसांनी सांगितले.
गेल्या आठवड्यात वापीजवळील कॅनॉलमध्ये शिराविना मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणात दोन पुरुष आणि एका अल्पवयीन मुलाला अटक केली होती. दादरा आणि नगर हवेलीतील सायली गावात राहणारा नऊ वर्षीय मुलगा २९ डिसेंबरला बेपत्ता झाला होता. याप्रकरणी सिल्वासा पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात पंतप्रधा आला होता.




