महाराष्ट्र

अभिनेत्री दीपाली सय्यदने पाकिस्तानी राष्ट्रीयत्व स्वीकारल्याचा दावा

मुंबई : शिंदे गटाच्या नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी पाकिस्तानी राष्ट्रीयत्व स्वीकारलं असून त्यांच्याकडे पाकिस्तानी पासपोर्ट आहे. पाकिस्तानमध्ये दीपाली सय्यद यांचं नाव सोफिया सय्यद आहे, असा खळबळजनक दावा त्यांचे माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे. पत्रकार परिषद घेत भाऊसाहेब शिंदे यांनी हे गंभीर आरोप केले.

दीपाली सय्यद यांचे माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे हणाले की, गेल्या तीन महिन्यात मी दीपाली सय्यदचे अंडरवर्ल्डशी संबंध असणारे अनेक पुरावे प्रशासनाला दिले आहेत, पण त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. मी तुम्हाला दीपाली सय्यद यांच्या बँक खात्यांचा तपशील दिला आहे. २०१९ मध्ये दिपाली सय्यद यांना पाकिस्तानचा नकली पासपोर्ट देण्यात आला. त्या पासपोर्टची प्रतही मी तुम्हाला दिली. दीपाली सय्यद यांनी पाकिस्तानचं राष्ट्रीयत्व स्वीकारलं आहे. पाकिस्तानात त्यांचं नाव सोफिया सय्यद आहे, असा दावा शिंदे यांनी केला.

दीपाली सय्यद यांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमशी आणि त्याच्या बायकोशी संबध आहेत. तसेच लंडन, दुबई येथे त्यांची मालमत्ता आहे, असा गंभीर आरोप भाऊसाहेब शिंदे यांनी केला.

“आम्हाला परवानगी द्या, आम्ही दीपाली सय्यदला गोळ्या घालून मारू… ज्या बाईचे पाकिस्तानशी संबंध आहेत. त्या अनेकदा पाकिस्तानात जातात, कराचीत राहतात. त्यांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊदशी आणि त्याच्या बायकोशी संबंध आहेत. आम्हाला परवानगी द्या, आम्ही दीपाली सय्यदला भरदिवसा गोळ्या घालतो. आम्ही तुरुंगात जायलाही तयार आहोत,” असंही भाऊसाहेब शिंदे म्हणाले.

Img 20221126 wa02126927299965323449855 1

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये