पुणे शहर

बिबवेवाडीमध्ये पदपथांवर राजकीय अतिक्रमणात वाढ.

बिबवेवाडी – सर्वसामान्य नागरिकांच्या कररुपी पैशातून दरवर्षी करोडो रुपये पद्पथांवरती खर्च केले जातात. मात्र पालिका प्रशासन व राजकीय आशीर्वादांमुळे पद्पथांवरील अतिक्रमणे वाढत असून सर्वसामान्य नागरिकांना मात्र जीव मुठीत घेऊन रस्त्यांवरून चालावे लागत आहे. त्यामुळे पदपथ नक्की कोणासाठी बनवण्यात आले आहेत असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Img 20201024 wa0166 1

या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनाधिकार सेवाचे पुणे अध्यक्ष विशाल शिंदे यांनी सहाय्यक आयुक्त गणेश सोनुने यांच्याकडे सदर पदपथावरील अतिक्रमणे काढून कारवाई करण्यासंदर्भात पत्र दिले असून कारवाईची मागणी केली आहे.

Img 20201028 wa0145

बिबवेवाडी परिसरात अनेक ठिकाणी पदपथावर राजकीय अतिक्रमणांबरोबरच इतर अतिक्रमणे मोठ्या प्रमाणावर होत असून प्रशासनाकडून मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप केला जात आहे. पदपथावर वाचनालय, ग्रंथालय, ई-सेवा केंद्र, पाणपोई, विरंगुळा केंद्र अश्या सुविधा देण्याच्या नावाखाली पद्पाथांवरती पक्के बांधकामे केली जात असल्याने पालिका प्रशासनाने त्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरीकांचे म्हणणे आहे.

करोना काळात अतिक्रमणावरच्या कारवाईचा वेग थंड झाला आहे. म्हणूनच की काय असल्या बांधकामांची या भागात भर पडत आहे. आता अशा अतिक्रमणांकडे पालिका प्रशासनाने लक्ष देऊन कारवाई करणे गरजेचे असल्याचे विशाल शिंदे यांनी सांगितले.

सहायक आयुक्त गणेश सोनुने यांच्याशी संपर्क केला असता संबंधित अधिकाऱ्याकडून माहिती घेत आहे. विषय समजून घेऊन योग्य ती पुढील कार्यवाही करण्यात येईल. अशी माहिती देण्यात आली आहे.

ज्यांचा आदर्श सर्वसामान्यांनी घ्यावा असे लोकप्रतिनिधी आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनीच अशा पद्धतीने बेकायदेशीर कचेऱ्या आणि ऑफिस पदपथावर थाटली तर नागरिक नक्कीच त्रस्त होणार आहेत. लोकप्रतिनिधी जनसेवेसाठी असतात ह्याची त्यांनी नक्कीच दखल घ्यावी. – सचिन शिंगवी, सामाजिक कार्यकर्ता

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये