राष्ट्रीय
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, तृणमुल काँग्रेस आणि सीपीआयचा राष्ट्रीय दर्जा रद्द

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द करण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला आहे. त्यासोबत ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेस आणि सीपीआय या पक्षाचाही राष्ट्रीय दर्जा रद्द करण्यात आला आहे. दुसरीकडे निवडणूक आयोगाने आम आदमी पक्षाला एकप्रकारे प्रमोशन दिल्यासारखा निर्णय घेतला आहे. कारण निवडणूक आयोगाने आम आदमी पक्षाला केंद्रीय पक्षाचा दर्जा दिला आहे.
निवडणूक आयोगाने आज संध्याकाळी याबाबतची घोषणा केली. आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि तृणमुल काँग्रस पक्ष आता प्रादेशिक पक्ष म्हणून ओळखले जाणार आहेत. निवडणूक आयोगाने पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढला हा शरद पवारांसाठी मोठा धक्का मानला जातोय




