पुणे शहर
महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले; 1 फेब्रुवारीला प्रभागरचनेचा प्रारुप आराखडा

पुणे : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा आगामी निवडणुकीसाठीचा प्रारुप प्रभाग रचनेचा आराखडा 1 फेब्रुवारी 2022 रोजी प्रसिद्ध होणार आहे. त्यावर 1 ते 14 फेब्रुवारी दरम्यान हरकती सूचना मागविल्या जाणार आहेत. पुणे महापालिकेची प्रभाग रचना हि १ फेब्रुवारी लाच जाहीर होण्याची शक्यता आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवच्या प्रभाग रचनेसाठी प्राप्त हरकती 16 फेब्रुवारी रोजी आयोगाला सादर कराव्या लागणार आहेत. 26 फेब्रुवारी रोजी या हरकतीवर सुनावणी घेण्यात येईल. सुनावणीनंतर प्राधिकृत अधिकाऱ्यांनी केलेल्या शिफारसी 2 मार्च 2022 रोजी निवडणूक आयोगाला पाठवावे लागणार आहे. आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी हा कार्यक्रम महापालिकेला पाठविला आहे.










