पुणे जिल्हा

उष्माघाताने पक्षांचा मृत्यू

पुणे : उष्णतेच्या झळा वाढत असून याचा फटका पशुपक्ष्यांनाही बसत आहे. पुरेसे अन्न पाणी मिळत नसल्याने उष्माघाताने पक्षांच्या मृत्यूच्या घटना घडत असून निरगुडसर येथे गेल्या चार-पाच दिवसात करकोच्या जातीचे पक्षी झाडावरून पडून त्यांचा मृत्यू होत असल्याचे समोर आले आहे.

कडक उन्हाळा असल्याने वन्य प्राण्यांसह, पशुपक्षी अन्न, पाण्याच्या शोधात इकडे तिकडे भटकत आहेत. पक्ष्यांना उन्हाचा त्रास होत आहे. पाणी मिळत नसल्याने अनेक पक्षांचा मृत्यू होत आहे. निरगुडसर (ता. आंबेगाव) बस स्थानकावर असलेल्या मोठ्या वटवृक्षावर बसणारे करकोचे पक्षी उष्माघाताने रस्त्यावर पडून मृत्यू झालेले आढळून आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये