पुणे जिल्हा

बावधनकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटीबद्ध : सुनेत्रा पवार

बावधन : बारामती लोकसभा मतदार संघाच्या महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा अजित पवार यांना  बावधन परिसरातून मताधिक्य मिळवून देण्यासाठी भाजपने जोर लावला असून त्यानुसार रणनीती अवलंबली जात आहे.  सुनेत्रा पवार यांनी बावधन परिसरातील सोसायट्यांना भेटी देत नागरिकांशी संवाद साधत त्यांचे प्रश्न जाणून घेतले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर भाजपने ही शहरी भागातून सुनेत्रा पवार यांचा प्रचार जोरात सुरू केला असल्याचे दिसून येत आहे.

Fb img 1711992876111
बावधनमध्ये महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचे किरण दगडे पाटील यांच्याकडून जंगी स्वागत

भाजपचे माजी नगरसेवक किरण दगडे पाटील यांच्या माध्यमातून सुनेत्रा पवार यांचे बावधन मध्ये जोरदार स्वागत करण्यात आले. या स्वागतासाठी भव्य पुष्पहार तयार करण्यात आला होता. या स्वागतानंतर विविध सोसायट्यांमध्ये जात पवार यांनी नागरिकांशी संवाद साधला. सोसायट्यांमधील नागरिकांशी संवाद साधत असताना  बावधनकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी आगामी काळात कटीबद्ध असेल असे मत सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केले.

Img 20230717 wa0012281298961742807603730839

यावेळी किरण दगडे पाटील म्हणाले, पूर्वी बावधन गावठाण  होते, मात्र आता एका एका बिल्डिंग मध्ये एक गाव आहे. एवढे नागरीकरण झाले आहे. ग्रामपंचायत असताना आम्ही नागरिकांना शक्य होईल तेवढ्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला. मात्र आता पालिकेत समाविष्ट होऊनही आम्हाला योग्य सुविधा मिळत नसून प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे. आता आगामी काळात सुनेत्रा वहिनींच्या माध्यमातून बावधनला आवश्यक सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल.

नरेंद्रजी मोदी यांना पुन्हा पंतप्रधान पदावर बसवण्यासाठी महायुतीच्या उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार यांना मतदान करण्याचे त्यांनी आवाहन केले. बावधन, भुसारी कॉलनी आणि मुळशीतून सुनेत्रा पवार यांना मताधिक्य देण्यासाठी भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता प्रयत्न करत असल्याचे किरण दगडे पाटील यांनी सांगितले.

Screenshot 2024 02 08 13 58 58 104172624598441830192
Img 20240202 wa00029218339254755901166

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये