कोथरूड – बावधन क्षेत्रीय कार्यालयाचे ई-कचरा संकलन अभियान..

कोथरुड : pune city कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय पुणे महानगरपालिका आरोग्य विभाग, कमिन्स इंडिया लिमिटेड कंपनी व जनवाणी या तीनही संस्थेच्या संयुक्त विद्यमाने प्रभाग क्रमांक १२, डहाणूकर कॉलनी हजेरी कोठी अंतर्गत स्वच्छ भारत अभियान अंतर्गत “शून्य कचरा प्रणाली प्रकल्प” यशस्वीपणे राबवण्यासाठी ई कचरा संकलन उपक्रम राबविण्यात आला. Kothrud – Bawadhan Regional Office e-waste collection campaign ..
सदर उपक्रमामध्ये आपल्याला नको असलेल्या वस्तू किंवा साहित्य इतरत्र न टाकता ३ आर कचरा संकलन उपक्रमामध्ये आणून द्यावे आणि आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी पुणे महानगर पालिकेला सहकार्य करावे अवाहन सदर अभियानात नागरिकांना करण्यात आले.
नागरिकांच्या घरात असलेल्या टाकाऊ वस्तू कचऱ्यामध्ये न टाकता त्या वस्तू या उपक्रमाद्वारे महानगरपालिकेला सुपूर्द केल्या तर त्या वस्तूंचा पुनर्वापर करणे, दुरुस्ती करणे पुन: प्रक्रिया करून टाकाऊ वस्तू पासून नवीन वस्तू तयार केल्या जातात. सदर अभियानात १५५ किलो प्लास्टिक, २३० किलो जुने कपडे, ४३ जोड चपला, २७ जोड बूट, ५ टि.व्ही. ४ संगणक, ४ लॅपटॉप, ९ सांऊन्ड सिस्टीम, १७ घड्याळे, २० मोबाईल तसेच चार्जर, वायर, सेल, बॅटऱ्या, रेडिओ असे एकूण २४२७ किलो वजनाच्या टाकाऊ वस्तू जमा झाल्या. सदर आभियानात डहाणूकर कॉलनीतील एकूण ९७ नागरिकांनी आपल्या कडील जुन्या व टाकाऊ वस्तू उत्स्फूर्तपणे आणून देऊन सहभाग नोंदवला.
पुण्यात चौथ्या मजल्यावरून पडणाऱ्या मुलीचे वाचवले प्राण
हे ई-कचरा संकलन अभियान दर महिन्याच्या ७ तारखेला डहाणूकर कॉलनी लेन नंबर १८ सर्कल जवळ गणपती मंदिराच्या समोर व डहाणूकर कॉलनी आरोग्य कोठी या ठिकाणी सकाळी ९ ते २ या वेळेत सुरू राहणार आहे. सदर अभियान महापालिका सहाय्यक आयुक्त सचिन तामखडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राम सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली तसेच आरोग्य निरीक्षक सचिन लोहकरे, करण कुंभार यांच्या निरीक्षणाखाली मुकादम वैजीनाथ गायकवाड, अण्णा ढावरे,जनवाणीच्या जयश्री पाटील, राजू सकट, सुरेश कंधारे,चंद्रकांत धोत्रे, कुणाल जाधव यांनी राबविले.






