पुणे शहरराजकीय

अशी झाली शशिकांत सुतार यांची ‘चेअरमन ‘ ही ओळख

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री शशिकांत सुतार यांना आपुलकीने ‘भाऊ’ म्हटले जाते. कोथरूडमध्ये भाऊ म्हणजे सुतार हे सांगावे लागत नाही. याच भाऊंना शिवसेनेचे जुने कार्यकर्ते ‘चेअरमन’ असे अभिमानाने संबोधायचे.

पुणे महापालिका शिक्षण मंडळात शशिकांत सुतार अध्यक्ष होते आणि नंतर ते महापालिकेच्या स्थायी समितीचेही अध्यक्ष झाले. अध्यक्षांना चेअरमन म्हटले जात होते. शिवसेनेला ही दोन पदे प्रथमच मिळाली होती, त्या विषयी पक्षात कौतुक होते. म्हणून खासगीत बोलताना शिवसेनेचे कार्यकर्ते भाऊंचा उल्लेख चेअरमन असा करायचे. साधारणत: १९८० ते ९० सालातील या आठवणी आहेत. भाऊंची चेअरमन ही ओळख दीर्घ काळ राहिली.

Whatsapp image 2022 03 01 at 8. 13. 02 am

चेअरमनला महापालिकेची गाडी मिळते. त्या काळी सरकारी गाडी ॲम्बॅसिडर असायची. सुतार यांना मिळालेल्या गाडीचेही पक्षात आकर्षण होते. शिवसेनाप्रमुखांचे स्वागत असो वा पक्षाचा कार्यक्रम असो तिथे सुतारांची गाडी असायची आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना अप्रूप वाटायचे. पुढे युती सरकारच्या काळात शशिकांतभाऊंना मंत्री म्हणून लाल दिव्याची गाडी मिळाली, कोथरुडवासीयांनी सत्कारप्रसंगी त्या गाडीचे जल्लोषात स्वागत केले होते.

Screenshot 2022 01 29 09 52 08 45

कोथरुड आणि शशिकांत सुतार असे समीकरण लोकांच्या मनात रुजले आहे. सुतार यांच्या राजकीय वाटचालीत प्रत्येक टप्प्यावर कोथरुडवासीयांनी त्यांना मनापासून साथ दिली आहे. आजही भाऊंविषयी कोथरुडमध्ये आणि शहराच्या राजकारणात जिव्हाळ्याची भावना आहे.

शशिकांतभाऊंचा आज वाढदिवस आहे, त्यांना शुभेच्छा !

राजेंद्र पंढरपूरे (जेष्ठ पत्रकार,राजकीय विश्लेषक)

Img 20220225 wa00035521681856149145908

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये