पुणे शहर

मनसेच्या माजी नगरसेविका जयश्री मारणे यांचा मनसेला धक्का; राष्ट्रवादीत प्रवेश

पुणे : मनसेच्या माजी नगरसेविका जयश्री मारणे यांनी आज मनसेला धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी चे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, माजी उपमहापौर, नगरसेवक दीपक मानकर, माजी सभागृह नेते शंकर केमसे, रुपाली ठोंबरे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश करण्यात आला.

मनसेच्या नेत्या व माजी नगरसेविका जयश्री मारणे यांची कोथरूड भागामध्ये मोठी राजकीय ताकद आहे. त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्याने कोथरूड भागामध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढणार आहे.

आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मारणे यांनी केलेला प्रवेश राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि अजित पवार यांच्या विचाराने प्रेरित होऊन मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. अशी प्रतिक्रीया जयश्री मारणे यांनी व्यक्त केली आहे.

Screenshot 2022 01 29 09 52 08 45

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये