महाराष्ट्र

पुणे-औरंगाबाद मार्गावर ‘या’ महिन्यापासून धावणार ‘शिवाई’

पुणे : राज्य परिवहन महामंडळाच्या म्हणजेच एसटीच्या वीजेवर चालणाऱ्या वातानुकूलित ‘शिवाई’ बससेवेला पुणे आणि नगरकरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आणखी नवे मार्ग कधी सुरू होणार, अशी विचारणा प्रवाशांकडून सातत्याने होत असतानाच ‘एसटी’ने दुसऱ्या मार्गाची तयारी सुरू केली आहे. जुलैअखेर पुणे-औरंगाबाद मार्गावर ‘शिवाई’ बससेवा सुरू होईल, असे ‘एसटी’च्या सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. नाशिक, कोल्हापूर आणि सोलापूर हे मार्ग त्यानंतर सुरू होतील, असे सांगण्यात येत आहे.

कमी खर्चात हा आरामदायक प्रदूषणुक्त प्रवास प्रवाशांच्या पसंतीस उतरला आहे. राज्य परिवहन महामंडळाकडून अशा 150 ‘शिवाई’ बस टप्प्याटप्प्याने घेण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात यापैकी 50 ‘शिवाई’ बस घेण्यात येणार आहेत. औरंगाबाद मार्गावर सुरुवातीला दोन शिवाई बस सुरू केल्या जातील.

Img 20220610 wa0330

आषाढी यात्रेची तयारी

यंदा 10 जुलै 2022 ला आषाढी एकादशी येत असून त्याआधी पंढरपूर येथे आषाढी एकादशीनिमित्त येणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी सुमारे चार हजारांच्या आत एसटीच्या जादा बस सोडण्याचे नियोजन केले आहे. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर आदी विभागांतून या जादा बस सोडण्यात येणार आहेत.

Img 20220518 wa00135092505186750304354
Img 20220521 wa0000

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये