कोथरूडमध्ये बदलापूर घटना व महिलांवरील वाढत्या अत्याचारा विरोधात जोरदार निदर्शने..
इंडिया फ्रंट आघाडी व महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन
कोथरूड : बदलापूर badlapur प्रकरणातील राज्य सरकारची असंवेदनशीलता, गृह विभागाचे अपयश व राज्यातील ढासळती कायदा सुव्यवस्था याविरोधातील कोथरुड मधील इंडिया फ्रंट आघाडी india front alliance व महाविकास आघाडीच्या mahavikas aaghadi पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कर्वे पुतळा चौकात निदर्शने करत निषेध नोंदवला. यावेळी कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, शिवसेनेचे माजी गटनेते, माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरेचे शहराध्यक्ष गजानन थरकुडे, माजी नगरसेवक रामचंद्र कदम, योगेश मोकाटे, उमेश कंधारे, स्वप्नील दुधाने, विजय खळदकर, राजेश पळसकर, भारत सुतार, गिरीश गुरुनानी, संदीप मोकाटे, जयदीप पडवळ, राज जाधव व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने या निदर्शन आंदोलनात सहभागी झाले होते.
शाळा भाजपच्या नेत्यांच्या, उज्वल निकम भाजपचे प्रवक्ते, तेच ही केस लढणार तर पीडितांना न्याय कसा मिळणार / बहोत हुवा नारी पर वार, डूब मरो महायुती सरकार/नराधमांना फाशी द्या चिमुकल्यांना न्याय द्या/ लाडक्या बहिणीला न्याय द्या बहिणीच्या लेकींना सुरक्षा द्या/चिमुकल्यांनो माफ करा आपले सरकार आपले रक्षण करू शकत नाही. / लाडकी बहीण नको सुरक्षा बहीण योजना पाहिजे/एकनाथ शिंदे राजीनामा द्या/गृहमंत्र्यांचे लक्ष सत्तेवर कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर अशा आशयाचे फलक घेऊन कार्यकर्ते, महिला पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. यावेळी कोथरुड मधील इंडिया फ्रंट आघाडी व महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.