पुणे जिल्हा

नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी महाराष्ट्रातून खासदारांची मोठी संख्या उभी करायची आहे ; अजित पवार

खडकवासला विधानसभा मतदारसंघातील मध्यवर्ती निवडणूक कचेरीचे अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे : बारामती लोकसभा मतदार संघाच्या ने राष्ट्रवादी – महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ खडकवासला मतदार संघातील पुण्यातील नऱ्हे रोड येथे महायुतीच्या मध्यवर्ती निवडणूक कचेरीचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार व  उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

खडकवासला विधानसभा मतदार संघाचे प्रचार प्रमुख म्हणून आपण भीमराव तापकीर यांची निवड करण्यात आली असल्याचे अजित पवार यांनी सुरुवातीला जाहीर केले. पवार म्हणाले, महायुतीच्या कार्यकर्त्यांना सांगणं आहे आहे की, कचेरीच्या माध्यमातून प्रचाराची आखणी व्यवस्थित झाली पाहिजे. या भागात मोठ मोठ्या सोसायट्या आहेत. येथील प्रश्न फार मोठे नाहीत, आपल्या आवाक्यातील आहेत. हे प्रश्न मी,  चंद्रकांत पाटील, भिमराव तापकीर, महायुतीचे सहकारी आपण ते सहज सोडवू शकतो. तशी ग्वाही प्रचारा दरम्यान महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना द्यावी याबाबत तिळमात्र शंका मनात ठेवू नये.

७ मे ला महायुतीचे पदाधिकारी जेवढे मतदान करून घेतील तेवढे मताधिक्य बारामतीच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्याला तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर बसवायच आहे, त्यासाठी त्यांच्या पाठीशी आपल्याला खासदारांची मोठी संख्या उभी करायची आहे. ती जबाबदारी आपल्या महाराष्ट्रावर आलेली आहे. महाराष्ट्राने एखादी जबाबदारी स्वीकारली तर महाराष्ट्र कमी पडत नाही असा आपला इतिहास आहे असे पवार म्हणाले.

Img 20240404 wa00195661228638643442239

कुठेही आपण कमी पडणार नाही. जास्तीत जास्त पोषक वातावरण कसे होईल आणि आपले बारामती, पुणे, शिरूर, मावळचे उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वांनी खबरदारी घ्यावी. विरोधी विचाराचा खासदार गेला तो भाषण देण्याशिवाय काही करू शकणार नाही. निधी आणू शकणार नाही त्यामुळे विकास साधता येणार नाही हे मतदारांना सांगा असे पवार म्हणाले. 

याप्रसंगी खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर, प्रदीप रावत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर, भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, प्रदीप गारटकर, राष्ट्रवादीचे खडकवासला मतदारसंघाचे अध्यक्ष बाबा धुमाळ, दिलीप बराटे, शुक्राचार्य वांजळे, यांच्यासह महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Img 20240404 wa00142311409567432001146
Img 20240404 wa00154462680026350583661

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये