खादी कपडे घालून मिरवणे बंद करा लोकांमध्ये मिसळून काम करा. राज ठाकरेंचा मनसैनिकांना प्रेमाचा सल्ला

कोथरूड विभागाच्या बैठकीत कार्यकर्त्यांशी मनमोकळा संवाद
पुणे : खादी कपडे घालून मिरवणे बंद करा लोकांमध्ये मिसळून काम करा. तुम्ही संघटनेचे कार्यकर्ते आहात. निवडणुकीच्या दृष्टीने सर्व सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करा. असा प्रेमाचा सल्ला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिला.
पुणे महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी राज ठाकरे दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. आज कोथरूड, शिवाजीनगर, खडकवासला आणि पर्वती विधानसभा मतदासंघांतील विभाग अध्यक्ष, उपविभाग अध्यक्ष, शाखा अध्यक्ष यांच्या बैठका ठाकरे यांच्या उपस्थितीत सुरू आहेत. कोथरूड मतदासंघांतील कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.

ठाकरे यांनी यावेळी प्रत्येक कार्यकर्त्यांशी चर्चा करीत आगामी निवडणूकीसाठी कशी तयारी सुरू आहे. लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तूम्ही काय प्रयत्न करीत आहात. काम करताना काय अडचणी येत आहेत का? अशा प्रकारे विविध विषयांवर कार्यकर्त्यांशी मन मोकळा संवाद साधला.
नेत्यांना सभाग्रहात प्रवेश नाही.
राज ठाकरे यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या बैठकांना पक्षाच्या शहर अध्यक्षांसह वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. मात्र कोणत्याही नेत्याला बैठकीच्या सभागृहात प्रवेश दिला गेला नाही. हि बैठक केवळ कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी असल्याने नेत्यांना प्रवेश न देण्याचा पूर्व नियोजित होते.



