पुणे शहर

पुणे महापालिकेची सामाजिक बांधिलकी; अपघातग्रस्त सफाई सेविकेला चार लाख साठ हजार रुपयांची मदत

पुणे : पुणे महापालिकेच्या औंध क्षेत्रीय कार्यालयामधील सफाईसेविका श्रीमती अरुणा संजय पत्री यांना कामावर असताना अपघात झाला व अपंगत्व आले. कामगार कल्याण विभागामार्फत “समूह वैयक्तिक अपघात विमा योजना” अंतर्गत मा. कामगार अधिकारी अरुण खिलारी व विशाल शिंदे यांनी त्यांना त्यांच्या घरी जाऊन रु. ४,६०,०००/- चा धनादेश सुपूर्त केला.

औंध क्षेत्रीय कार्यालयातील सफाई सेविका अरुणा संजय पत्री यांना सफाईचे काम करत असताना काही दिवसांपूर्वी गंभीर अपघात झाला होता. या अपघाता मुळे त्यांना अपंगत्व आले आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. या परिस्थिती मध्ये त्यांना मदतीची गरज होती. अशातच पुणे महापालिकेने कामगार कल्याण विभागामार्फत “समूह वैयक्तिक अपघात विमा योजना” अंतर्गत त्यांच्या घरी जाऊन रु. ४,६०,०००/- चा धनादेश सुपूर्त केला. महापालिकेच्या या कामाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Screenshot 20211227 1402344603556305344739789

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये